Ahmednagar Dam Storage News : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र चांगला जोरदार पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर ओसरला. जवळपास आठ ते नऊ दिवस पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेत. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.
16 ऑगस्ट राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र काल अर्थातच 17 ऑगस्टला राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला.
काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.
मात्र राज्यात सुरू असणाऱ्या या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्येही पाण्याची आवक वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जवळपास 5 धरणे 90 टक्क्यांवर पोहचली आहेत.
तथापि, अनेकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा किती टक्के आहे याबाबत विचारणा केली जात आहे. त्यामुळे आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा सध्याचा पाणीसाठा थोडक्यात जाणून घेणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा
भंडारदरा : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील भंडारदरा धरणात ९६.२६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
निळवंडे : निळवंडे हेदेखील उत्तरेकडील एक महत्त्वाचे धरण असून यामध्ये सध्या स्थितीला ९१.१२ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
सीना : सीना धरणात सध्या स्थितीला ३४.३८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
खैरी : खैरी धरणात सध्या ७३.०३ टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
विसापुर : या धरणात सध्या ८४.९४ टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
मुळा : उत्तरेकडील मुळा धरणात सध्या स्थितीला ८८.७५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
आढळा : जिल्ह्यातील उत्तरेकडील आढाळा धरणात सध्या १००.०० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
डिंभे : डिंभे धरणात सध्या ९१.९७ टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
घोड : घोड धरणात सध्या ८८.११ टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
मां.ओहोळ : या धरणात ७.३१ टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
घा.पारगाव : या धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
भोजापुर : जिल्ह्यातील भोजापुर या उत्तरेकडील धरणात सध्या स्थितीला ९६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
पिंप.जो : जिल्ह्यातील दक्षिणेकडील या धरणात ३५.८८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
येडगाव : दक्षिणाकडील या जिल्ह्यात सध्या ७३.७५ टक्के एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे.
वडज : दक्षिणेकडील वडज धरणात सध्या ७४.६६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
माणिकडोह : या धरणात सध्या ५३.५६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.