Ahmednagar Highway News : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातही रस्त्याच्या विकासकामांनी वेग धरला आहे. लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून यातून त्यांना निधी मंजूर होत आहे.
दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीकडून अहमदनगर जिल्ह्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. पारनेर नगर मतदार संघातील दोन रस्त्यांच्या कामासाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
या रस्त्यांसाठी निधी हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पारनेर तालुक्यातील सारोळा आडवाई ते खोडदेबाबा मंदिर या ग्रामीण मार्ग क्र. 74 च्या दुरूस्तीसाठी वारंवार संबंधित ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे, शासनाकडे मागणी केली जात होती.
लोकप्रतिनिधींकडे देखील यासाठी पाठपुरावा सुरू होता. आमदार लंके यांच्याकडे देखील या रस्त्या संदर्भात अनेकांनी मागणी केली होती. अखेरकार या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय नगर तालुक्यातील शिंगवे ते वांबोरी या ग्रामीण मार्ग क्र.3 च्या सुधारणेसाठी देखील स्थानिकांकडून वारंवार मागणी केली जात होती. आता जिल्हा नियोजन समितीमध्ये या रस्त्याच्या सुधारण्यासाठी देखील 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आमदार लंके यांनी देखील जातीने लक्ष घालून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यांच्या सुधारण्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
निश्चितच पारनेर नगर मतदारसंघातील या दोन रस्त्यांची दुरुस्तीची कामे आता लवकरात लवकर केली जाणार असल्याने या संबंधित रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे निश्चितच पारनेर नगर मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत होण्यास मदत होणार आहे.