स्पेशल

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….

Ahmednagar News : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर देशातील शेतकऱ्यांचा हितासाठी कायमच नवनवीन निर्णय घेत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार देखील याला अपवाद नाही. मोदी सरकारने 2014 पासून ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तर काही निर्णयामुळे शेतकऱ्यांचे थोडे नुकसानही झाले असेल.

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना देखील राबवल्या आहेत. यात पीएम किसान सन्मान निधी योजना ही सुपरहिट ठरलेली योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेची भुरळ शेतकऱ्यांसहित जाणकार लोकांना देखील पडलेली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोक देखील या योजनेचे मुरीद बनले आहेत.

खरंतर, ही योजना शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. हे पैसे 2 हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात. अर्थातच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता शेतकऱ्यांना मिळतो.

या योजनेची भुरळ राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला देखील पडली आहे. हेच कारण आहे की, शिंदे फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच अर्थसंकल्पात या योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली.

हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….

नमो म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना अगदी पीएम किसान योजनेसारखीच आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या योजनेचे स्वरूप आणि निकष पीएम किसान योजनेप्रमाणेच आहेत.

ज्या पीएम किसानच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो आहे त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच यापुढे राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत.

मात्र या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून या योजने संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान आणि नमो शेतकरी साठी जिल्ह्यातील एक लाख एक हजार २४९ लाभार्थी वंचित राहणार आहेत.

या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया केलेली नसल्याने यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार, जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे 5 लाख 89 हजार 852 लाभार्थी आहेत.

यापैकी 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांनी योजनेसाठी आवश्यक केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र 1 लाख 1 हजार 249 लाभार्थ्यांनी अजूनही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही यामुळे हे शेतकरी या दोन्ही योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि ‘त्या’ जिल्ह्यात येत्या दोन-तीन तासात मुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

जिल्ह्यातील पावणे पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार

अहमदनगर जिल्ह्यातील पाच लाख 89 हजार 852 शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून यापैकी चार लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे. म्हणून या पावणे पाच लाख शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे 12 हजार रुपये मिळणार आहेत.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांचे बँकखाते आधारकार्ड सोबत लिंक नाही अशा शेतकऱ्यांनीही आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- कमी पाऊस पडला तरी सोयाबीनच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts