Ahmednagar Railway News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये गर्दी वाढू लागली आहे. या अतिरिक्त गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास मात्र प्रवाशांसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ शकतो. अशातच मात्र रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे दिलासादायक असे निर्णय घेत आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर नवीन विशेष सुपरफास्ट ट्रेन सुरू केल्या जात आहेत. यामुळे निश्चितच अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येणार आहे आणि अतिरिक्त गर्दी असतानाही रेल्वे प्रवाशांना वेळेत प्रवास करता येणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; जिल्हा परिषदेत एक हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर
दरम्यान आता अहमदनगरकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते कानपूर दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष गाडी सुरू केले जाणार आहे, आणि ही गाडी अहमदनगर मार्गे कानपूरला रवाना होणार आहे.
त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच या गाडीला नेमका कुठे थांबा राहणार आहे याबाबत देखील डिटेल माहिती समजून घेऊया.
पुणे कानपूर एक्सप्रेस रेल्वे गाडीचे वेळापत्रक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे ते कानपूर दरम्यान सुरू करण्यात आलेली ही स्पेशल ट्रेन साप्ताहिक आहे. म्हणजे आठवड्यातून केवळ एकच दिवस धावणार आहे. 01037 क्रमांकांची पुणे–कानपुर एक्स्प्रेस ही विशेष गाडी 3 मे ते 15 जून दरम्यान दर बुधवारी सकाळी 6.35 वाजता पुण्याहून सुटेल आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर नऊ वाजता पोहोचणार आहे त्यानंतर ही गाडी मग कोपरगाव मनमाड मार्गे कानपूर रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सात वाजता पोहचणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…
तसेच 01038 कानपुर–पुणे ही गाडी 4 मे ते 16 जून दरम्यान दर गुरुवारी सकाळी 8:50 वाजता कानपूर सेंट्रलवरून सुटेल आणि मग भुसावळ, मनमाड, कोपरगावमार्गे अहमदनगर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:05 वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.
या सुपरफास्ट ट्रेनला कुठे आहेत थांबे
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन आणि उरई या स्थानकावर थांबणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….