स्पेशल

वायू प्रदूषणामुळे मानवाच्या जीवनास सर्वाधिक धोका ; ‘या’ १० प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू

हवा ही आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत गोष्ट आहे. मात्र, वाढत्या औद्योगिकरणामुळे, वाहनांच्या वापरामुळे आणि इतर मानवी क्रियामुळे हवा प्रदूषित होत असून वाढते हे प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठे धोके निर्माण करत आहे.

पायाभूत सोयीसुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी व रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा मात्र कमालीचा घटत चालला आहे आणि त्याचे दुष्परिणाम यामुळे सातत्याने भोगावे लागत आहेत.

याचा परिणाम म्हणजे भारतातील या दहा शहरात वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ वायू प्रदुषणामुळे दरवर्षी या शहरांमध्ये ३३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. पुण्यासह भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये मृत्यूदरावर वायू प्रदूषणाचा परिणाम तपासण्यात आला.

यातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, शिमला आणि वाराणसी या दहा शहरांना प्रदूषणाचा विळखा आहे. हि धक्कादायक बाब ‘लॅन्सेट प्लॅनेट हेल्थ’च्या अहवालातून उघडकीस आली आहे. भारतातील या १० शहरांत वायू प्रदूषणामुळे ७ टक्के मृत्यू होत असल्याचे यात दिसून आले आहे.

पायाभूत सोयीसुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी व रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा मात्र कमालीचा घटत चालला आहे आणि त्याचे दुष्परिणाम यामुळे सातत्याने भोगावे लागत आहेत. त्यामुळेच आपल्याकडे कधी खूप पाऊस पडतो तर कधी मोठा दुष्काळ पडतो.

त्याच प्रमाणे सध्या दररोज रस्त्यावरील लहान मोठ्या वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी या वाहनांतून निघणारा धूर पर्यावरणाला हानिकारक ठरत असून, केवळ दिल्ली शहरात या समस्येमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या जवळपास साडेअकरा टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. दिल्लीत १२ हजार जणांना वायू प्रदूषणामुळे आपले जीव गमवावे लागत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

वायू प्रदूषणाची ही समस्या सातत्याने गंभीर स्वरूप धारण करत चालली असून, भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत आहेत. ‘लॅन्सेट प्लॅनेट हेल्थ’च्या या अहवालानुसार, या दहा शहरांतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबाबत मर्यादा आखून दिली आहे, त्यापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते.

हा अभ्यास करताना संशोधकांनी २००८ ते २०१९ या साधारणपणे ११ वर्षांच्या कालावधीतील मृत्यूच्या नोंदी तपासल्या आहेत. त्यातून हा निष्कर्ष जाहीर केला गेला आहे. त्यामुळे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आपले आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वायू प्रदूषण वाढते आहे आपल्याला आणि आपल्या भावी पिढींना याचा भयानक परिणाम जाणवणार आहेत .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts