स्पेशल

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! अकोला मार्गे धावणारी ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन सुरु झाली, पहा संपूर्ण वेळापत्रक

Akola Railway News : सध्या देशात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. तसेच लग्नसराईचा हंगाम देखील आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

खरं पाहता उन्हाळ्यामध्ये दरवर्षी रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. पर्यटनासाठी जाणारे पर्यटक उन्हाळ्यात रेल्वे मार्गे सर्वाधिक प्रवास करत असल्याने रेल्वेत गर्दी होत असते.

दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी पर्यटकांची आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे मार्गांवर विशेष ट्रेन सुरू केल्या जात आहेत. 

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! 10 वी आणि 12वी चा निकाल जून महिन्यातील ‘या’ तारखेला लागणार, पहा डिटेल्स

दक्षिण मध्य रेल्वेने देखील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अकोला मार्गे काचीगुडा ते बिकानेर ही रेल्वे सुरू केली आहे. ही एक साप्ताहिक गाडी असून वासिम अकोला मार्गे धावणार आहे.

ही गाडी 6 मे 2023 पासून सुरू झाली असून 27 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान आज आपण या स्पेशल एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा :- 12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघाली मोठी भरती, ‘या’ रिक्त पदाच्या 1600 जागांसाठी भरतीची घोषणा, पहा…

कसं असणार वेळापत्रक?

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काचीगुड़ा-बीकानेर गाडी क्रमांक 07053 ही गाडी 6 मे ते 24 जून पर्यंत दर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता काचीगुडा येथून रवाना होणार आहे.

मग ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी अकोला रेल्वे स्थानकावर सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी दाखल होणार आहे. मग ही गाडी सोमवारी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी बिकानेर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट

तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर बिकानेर-काचीगुडा गाडी क्रमांक 07054 9 मे ते 27 जून पर्यंत दर मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता बिकानेर रेल्वे स्थानकावरून काचीगुडा कडे रवाना होणार आहे.

मग ही गाडी बुधवारी रात्री 9:30 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर येणार आहे आणि मग गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता ही गाडी काचीगुडा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

निश्चितच ही गाडी अकोला जिल्ह्यातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्ये रेल्वेने घेतलेला हा निर्णय निश्चितच रेल्वे प्रवाशांच्या हिताचा राहणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार, पहा डिटेल्स

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts