Animal Husbandry : देशात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांची कायमच या व्यवसायाला पसंती लाभली आहे. विशेष बाब म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय बनला आहे. शेतकरी बांधव आता व्यावसायिक पद्धतीने पशुपालन करतात. आपल्या राज्यातील शेतकरीही पशुपालन मोठ्या प्रमाणात करत आहे.
पशुपालनात म्हशीचे पालन प्रामुख्याने केले जाते. हिंगोली जिल्ह्यातील एका पशुपालक शेतकऱ्याने देखील म्हैस पालनातून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष बाब अशी की या शेतकऱ्याने म्हैस पालन व्यवसायातून तब्बल 97 एकर शेत जमीन विकत घेतली आहे. यामुळे या प्रगतिशील शेतकऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील बेलवाडी येथील रामेश्वर मांडगे पशुपालक शेतकऱ्याने तीन एकर शेती आणि एक म्हैस घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली.
आजच्या घडीला मात्र या शेतकऱ्याकडे एकूण 100 एकर जमीन आणि 100 म्हशी आहेत. म्हैस पालन व्यवसायाच्या जोरावरच त्यांनी ही प्रगती साधली आहे. त्यामुळे त्यांनी म्हशीसाठी स्विमिंग पूल देखील बांधला आहे. रामेश्वर मांडगे सांगतात की, म्हशींच्या चारा व्यवस्थापनासाठी ते आपल्या 100 एकर शेत जमिनीपैकी 60 ते 70 एकर शेतीत चारा पिकांची लागवड करतात. यासोबतच या म्हशींना हरभरा, ज्वारी, करडई, मका हे धान्य भरडून दररोज सरकी पेंडीचा खुराक एकत्र करुन दिला जातो.
यामुळे या म्हशी पासून त्यांना चांगले दूध उत्पादन मिळते. विशेष म्हणजे या शंभर म्हशीसाठी त्यांनी दोन प्रकारचे गोठे बांधले आहेत. यामध्ये एक बंदिस्त गोठा आहे तर दुसरा गोठा अद्ययावत सुविधांनी युक्त आहे. विशेष बाब अशी की, या म्हशीची काळजी घेण्यासाठी सहा ते सात कामगार आहेत. हे कामगार सकाळी तीन वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत म्हशीना खुराक देण, अंघोळ घालण, पाणी देण यांसारखी कामे करतात.
एवढेच नाही तर या म्हशीना दुपारच्या उन्हापासून संरक्षित ठेवण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये यांची आंघोळ घातली जाते. यासाठी खास स्विमिंग पूल त्यांनी बांधला आहे. या शंभर म्हशीपासून त्यांना साडेतीनशे ते चारशे लिटर दूध रोजाना मिळते. हे दूध कामगार आणि स्वतः मांडगे घरोघरी जाऊन विकतात. खरं पाहता गेल्या काही वर्षांपूर्वी मांडगे यांना मोठे आर्थिक चनचन सहन करावी लागत होती. घरात प्रपंच भागेल असा पैसा येत नव्हता. परिणामी त्यांनी आपल्या वडिलांसमवेत एक म्हैस घेऊन दूध व्यवसायाची सुरुवात केली.
आजच्या घडीला या व्यवसायातून त्यांना चांगली कमाई होत असून इतरांना ते रोजगार देखील देत आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन एकर शेत जमीन त्यांच्याकडे होती आता त्यांच्याकडे 100 एकर शेत जमीन आहे. निश्चितच मांडगे यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणार आहे. केवळ शेतीवर विसंबून न राहता पशुपालन व्यवसायाची जोड दिली तर शेतकऱ्यांना निश्चितच शेतीमधून चांगली कमाई केली करता येऊ शकते हेच मांडगे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.