स्पेशल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता राज्यात सफरचंद लागवड होणार शक्य; शास्त्रज्ञांनी केली ही कामगिरी

Apple New Variety : सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्याच्या पुढ्यात उभे राहत ते काश्मीर आणि हिमाचल प्रदेश चे चित्र. या थंड हवामानाचे प्रदेशात सफरचंदाची मोठ्या प्रमाणात शेती होत असते. या प्रदेशातील शेतकऱ्यांचे सफरचंद शेतीवर अधिक अवलंबित्व असतं. मात्र आता काश्मीर आणि हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त ही भारतात इतर राज्यात सफरचंद शेती होऊ लागली आहे. आपल्या महाराष्ट्रातीलही प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली आहे.

यामध्ये अहमदनगर नासिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद लागवड केली आहे. यासोबतच इतरही काही जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात सफरचंद शेती केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशातही काही शेतकऱ्यांनी सफरचंद शेतीचा प्रयोग केला आहे.

हे पण वाचा :- Cibil Score खराब आहे का? चिंता नको, ‘या’ पद्धतीने सिबिल स्कोर खराब असतानाही कर्ज मिळणार, पहा….

विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांचा हा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. दरम्यान आता या उष्ण हवामानात सफरचंद शेती शक्य व्हावी यासाठी पंजाब कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक मोठी कामगिरी केली आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने सफरचंदाच्या दोन नवीन जाती विकसित केल्या आहेत. या जाती उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि पंजाब यांसारख्या उष्ण प्रदेशात उत्पादित होऊ शकतात असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

सफरचंदाला बाजारात असणारी मागणी आणि मिळणारा बाजार भाव पाहता या पिकाची शेती निश्चितच या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. कृषी जागरण या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंजाब कृषी विद्यापीठाने अन्ना आणि डोर्सेट गोल्डन नावाच्या दोन नवीन सफरचंदाच्या जाती विकसित केल्या आहेत. या जातींची शेती आता उष्ण प्रदेशातही सहज शक्य होणार आहे. निश्चितच यामुळे उष्ण हवामानात सफरचंद लागवड करून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळवता येणार आहे.

हे पण वाचा :- गोंदियाच्या शेतकऱ्याचा लेमनग्रास (गवती चहा) लागवडीचा प्रयोग यशस्वी; झाली लाखोंची कमाई

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंजाब कृषी विद्यापीठाने या दोन नवीन जाती विकसित करण्यासाठी तब्बल नऊ वर्ष मेहनत घेतली आहे. आता या जाती विकसित झाल्या असून या जातींची शेती 35 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असलेल्या भागात केली जाऊ शकते असा दावा आता केला जात आहे. कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सफरचंदाच्या या नवीन जातीची लागवड जानेवारी महिन्यात करावी लागणार आहे.

या जाती लागवड केल्यानंतर मार्च ते जून महिन्यात झाडांना सिंचन करावे लागणार आहे. सफरचंदाच्या या जातीची लागवड केल्यानंतर साधारणतः तीन वर्षानंतर उत्पादन मिळू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केल आहे. निश्चितच उष्ण प्रदेशात आता सफरचंद लागवड होऊ शकणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ कर्जदार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपयांचे कर्ज माफ

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts