स्पेशल

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 75 हजार लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र! काय आहे यामागील कारण? फेरपडताळणीचे काय?

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक खूप महत्त्वाची योजना असून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना खूप गेमचेंजर ठरली व या योजनेचा महायुती सरकारला खूप मोठा फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रति महिना लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जातो. या अनुषंगाने जर आपण नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर नाशिक जिल्ह्यातून साधारणपणे यापूर्वी 15 लाख 17 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे व या अगोदर लाभ घेतलेल्या संपूर्ण महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार आहेत.

परंतु हे पैसे नक्की कधी खात्यावर जमा होतील याची प्रतीक्षा आता लागून राहिली आहे. तसेच यापूर्वी ज्या महिलांनी जिल्ह्यातून अर्ज सादर केलेले आहेत अशा महिलांच्या प्राप्त झालेल्या अर्जांच्या फेर पडताळणीचे कुठल्याही स्वरूपाचे आदेश अजून पर्यंत तरी महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झालेले नाहीत.

या अगोदरच नाशिक जिल्ह्यातून 75 हजार महिलांचे अर्ज अपात्र
जेव्हा या योजनेसाठी अर्ज सादर केले जात होते तेव्हा महिलांनी अर्जासोबत जे सादर केलेले कागदपत्र होते त्यांची पडताळणी करण्यात आली होती व त्यामध्ये जिल्ह्यातील 75 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. जर आपण बाद झालेल्या या अर्जामागील प्रमुख समस्या पाहिल्या तर ते चुकीचा आधार क्रमांक,

स्वाक्षरी न जुळणे, अर्जदार एक व आधार दुसऱ्याचे अशा काही त्रुटींमुळे हे अर्ज बाद झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती.त्यानंतर या योजनेचे अर्ज स्वीकृती देखील बंद करण्यात आली व तेव्हापासून महिलांना या या योजनेचे पैसे देखील मिळालेले नाहीत.

त्यातच आता अर्जांची फेर पडताळणी होणार अशा स्वरूपाच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले व तशी चर्चा देखील सुरू झाल्या व त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. परंतु अशा प्रकारची कुठलीही फेर पडताळणी केली जात नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी मंजूर करण्यात आलेले अर्ज व लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.त्यामुळे ज्या महिलांना या अगोदरच या योजनेचे पैसे मिळालेले आहेत. त्यांना मात्र अजून डिसेंबरचे पैसे मात्र मिळालेले नाहीत. त्यामुळे आता हे पैसे खात्यावर कधी येतील याची प्रतीक्षा आता लाभार्थी महिलांना आहे.

तसेच नाशिक जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने यांनी याबाबत म्हटले आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जाची फेर पडताळणी करण्यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून कुठलाही आदेश अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही व त्यामुळे अर्ज बाद करण्याचा विषयच येत नाही. कागदपत्रा अभावी पाच टक्के महिलांचे अर्ज यापूर्वीच बाद झाले आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts