छत्रपती संभाजी नगर येथील नाथ ग्रुप तसेच महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजी नगर प्रस्तुत व त्यासोबतच मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी ऑस्कर नामांकित लगान तसेच स्वदेश यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची मानद अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे. यावर्षी या महोत्सवाचे दहावे वर्ष असणार असून छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
नाथ ग्रुप तसेच महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजी नगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेला दहाव्या अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
चित्रपट दिग्दर्शक क्षेत्रामध्ये आशुतोष गोवारीकर यांचे खूप मोठे नाव असून त्यांनी आतापर्यंत लगान, स्वदेश तसेच जोधा अकबर व पानिपत सारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शक आहेतच परंतु ते या चित्रपटांचे निर्माते देखील आहेत. सदरील महोत्सव हा केंद्र सरकारचे सूचना व प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने संपन्न होतो.
हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार असून आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत या महोत्सवाच्या संचालकपदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आशुतोष गोवारीकर यांची कारकीर्द कशी आहे?
या महोत्सवाच्या संयोजन समितीच्या मानद अध्यक्षपदी निवड झालेले आशुतोष गोवारीकर हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते असून त्यांनी आपला अभिनय तसेच दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रियेद्वारे भारतीय सिनेमा जगतामध्ये मागील 25 ते 30 वर्षांपासून उल्लेखनीय असे योगदान दिलेले आहे. विशेष म्हणजे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या चित्रपट महोत्सांमध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे.
इतकेच नाहीतर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांकरिता मतदान सदस्य म्हणून देखील ते काम पाहतात. त्यामुळे आता या महोत्सवाच्या अध्यक्ष पूर्तीची व्यापक वाटचाल येणाऱ्या काळात आशुतोष गोवारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
कशी आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची कारकीर्द?
19 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालकपदी राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी पदभार स्वीकारला असून श्रीयुत सुकथनकर यांनी देखील मागील तीन दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांचे योगदान मराठी चित्रपटांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इतकेच नाही तर देशभरात होणाऱ्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सुकथनकर यांनी ज्युरी अध्यक्ष व ज्युरी सदस्य या नात्याने देखील काम केलेले आहे.