Bank Account Information : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. मंडळी जर तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायला गेलात तेव्हा बँक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंट साठी नॉमिनी लावला जातो. बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट किंवा कोणत्याही इतर योजनेच्या अकाउंट साठी नॉमिनी ऍड केला जातो.
तुमच्या बँक अकाउंट ला लावण्यात आलेला नॉमिनी हा शक्यतो तुमच्या परिवारातीलच सदस्य असतो. तुमची आई, वडील, पत्नी किंवा घरातील इतर सदस्य नॉमिनी म्हणून जोडले जातात. जेव्हा बँक खातेधारकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या बँक अकाउंट मधील पैसे त्याच्या नॉमिनीला दिले जातात.
इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे बँक खातेधारक त्याला हवी ती व्यक्ती नॉमिनी म्हणून जोडू शकतो. म्हणजेच बँक अकाउंट ला जोडण्यात आलेला नॉमिनी हा घरातील सदस्यच असेल असे नाही. मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की बँक खाते धारक आपल्या अकाउंटला नॉमिनी जोडत नाहीत.
पण, जर समजा एखाद्या ग्राहकाने आपल्या बँक अकाउंटला नॉमिनी जोडलेला नसेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर मग त्या सदर ग्राहकाच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे नेमके कोणाला मिळतात हा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान आज आपण याच संदर्भात बँकेचे नियम नेमके काय सांगतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर पैसे कोणाला मिळतात
जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बँक अकाउंटला नॉमिनी जोडलेला नसेल आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशावेळी त्याच्या बँक अकाउंट मध्ये असणारे पैसे हे त्याच्या कायदेशीर वारसदाराला मिळतात. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कायदेशीर वारसदार नेमके कोण.
तज्ञ लोक सांगतात की, जर खातेदार विवाहित असेल, तर अशा परिस्थितीत त्याची पत्नी, त्याची मुले आणि पालक हे त्याचे कायदेशीर वारस बनतात. पण, जर खातेदार विवाहित नसेल तर त्याचे आईवडील आणि भावंड हे त्याचे कायदेशीर वारस समजले जातात.
अशावेळी मग बँक खाते धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे हे त्याच्या कायदेशीर वारसदाराला सुपूर्द होतात. मात्र कायदेशीर वारसदाराला मयत व्यक्तीच्या बँक अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी काही कागदपत्रे द्यावे लागतात.
मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसाचा फोटो, KYC, अस्वीकरण पत्र परिशिष्ट-A, क्षतिपूर्तीचे पत्र परिशिष्ट-C असे काही कागदपत्र बँकेत जमा करून सदर कायदेशीर वारस मयत व्यक्तीच्या बँक अकाउंट मधून पैसे काढू शकतो.