Loan Option Instead Of Bank Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला पैशांची गरज भासते व त्यावेळी ती गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जर आपल्याकडे नसेल तर कुठलाही व्यक्ती हा कर्जाचा पर्याय स्वीकारतो. यामध्ये मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे कर्जरूपाने किंवा हातऊसने घेतले जातात किंवा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनसारखा पर्याय वापरला जातो.
कर्ज घेताना बँकेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे असते व यामध्ये सिबिल स्कोर याला खूप महत्त्व असते. परंतु काही कारणास्तव बऱ्याच जणांचा सिबिल स्कोर हा घसरलेला असतो व त्यामुळे बँक कर्ज देत नाही व मोठी समस्या निर्माण होते.
त्यामुळे तातडीची पैशांची गरज असेल व बँकेने जर कर्ज द्यायला नकार दिला तर मात्र तुम्ही इतर काही पर्यायांचा वापर करून पैसा उभा करू शकतात व तुमच्या आर्थिक गरज भागवू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती आपण या लेखात बघू.
सिबिल स्कोर घसरल्यामुळे बँकेने कर्ज नाकारले तर या मार्गाने उभा करा पैसा
1- संयुक्त लोन घ्या- समजा तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुमचा सिबिल स्कोर खराब जरी असला तरी देखील तुम्ही जॉईंट लोन म्हणजे संयुक्त कर्जाचा पर्याय निवडू शकतात. तसेच तुम्ही एखादया व्यक्तीला गॅरेंटर बनवून देखील कर्ज घेऊ शकतात
तुम्हाला जर जॉईंट लोन घ्यायचे असेल तर तुमचा जॉईंट लोन होल्डर किंवा गॅरेंटर यांचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणे सोपे जाते.
संयुक्त लोन घेत असताना तुमच्या सह अर्जदार जर महिला असेल तर कर्जासाठी आकारण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये देखील तुम्हाला बऱ्याच प्रकारे फायदा मिळू शकतो.
2- सोनेतारण कर्ज- तुम्हाला जर घसरलेल्या सिबिल स्कोरमुळे बँकेने कर्ज द्यायला नकार दिला आणि अशा प्रसंगी तुमच्याकडे जर सोने असेल तर तुम्ही सोनेतारण कर्ज घेऊ शकतात. कारण हे कर्ज सुरक्षित प्रकारातले कर्ज असल्याने
आणि तुम्ही या प्रकारात तुमचे सोने तारण देत असल्यामुळे सिबिल स्कोर पाहिला जात नाही व सोन्याची जी काही सध्याची किंमत आहे त्याच्या 75 टक्के पर्यंत तुम्हाला लोन मिळू शकते. तसेच कमीत कमी कागदपत्र याकरता लागतात व तुम्ही सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात.
3- आडवांन्स सॅलरी लोन- बऱ्याच कंपन्या या ऍडव्हान्स सॅलरी लोन देतात. अशा प्रकारचे कर्ज हे तुमची जी काही पगार असेल तिच्या तीनपट असू शकते. या प्रकारचे कर्ज जर तुम्हाला घ्यायचे असेल तर याकरिता खूप काही कागदपत्रे तुम्हाला लागत नाहीत. ज्याप्रकारे पर्सनल लोन असते तसेच हे कर्ज असते व तुम्हाला सहजपणे ते मिळू शकते.
विशेष म्हणजे या प्रकारची कर्ज जर तुम्ही घेतले तर निश्चित कालावधीमध्ये ईएमआय भरून ते परतफेड करू शकतात. साधारणपणे पंधरा वर्षाच्या आत तुम्हाला हे फेडायचे असते.
4- नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी- समजा तुमचा सिबिल स्कोर घसरलेला आहे व तुम्हाला बँकेने कर्ज द्यायला नकार दिला तर तुम्ही अशावेळी तातडीची पैशांची गरज भागवण्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या अर्थात एनबीएफसी यांच्याकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात.
कारण बऱ्याच एनबीएफसी कमी सिबिल स्कोर वर देखील कर्ज देतात. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की तुम्हाला इतर बँकांच्या तुलनेमध्ये व्याजदर थोडा जास्त द्यावा लागू शकतो.
5- एफडी सारख्या इतर बाबींचा कर्जासाठी वापर- बऱ्याच जणांची बँकेमध्ये एफडी असते किंवा एलआयसी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारख्या ठिकाणी गुंतवणूक केलेली असते. जर अशा पद्धतीची गुंतवणूक असेल तर तुम्ही त्या बदल्यात कर्ज घेऊ शकतात.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे कर्ज घेतात तेव्हा तुम्ही किती गुंतवणूक केली आहे त्या रकमेच्या आधारे तुम्हाला कर्ज दिले जाते व अशा प्रकारच्या कर्जाची परतफेड तुम्हाला ठराविक कालावधीत करायची असते.
समजा तुमचे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेमध्ये एक आर्थिक वर्ष जुने खाते असेल तर तुम्ही या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात व या खात्यावर पाच वर्षापर्यंत कर्जाची सुविधा तुम्हाला मिळते.