Bank Of Baroda Personal Loan : आपल्यापैकी अनेक जण अचानक पैशांची गरज उद्भवली, काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा अन्य काही कारण असेल तर सर्वप्रथम पर्सनल लोन काढण्यास प्राधान्य देतो. जेव्हा कुठूनच पैशांचे ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा पर्सनल लोन काढले जाते.
पर्सनल लोन बँकांच्या माध्यमातून ताबडतोब मंजूर होते. यासाठी काही तारण सुद्धा ठेवावे लागत नाही. मात्र पर्सनल लोन हे असुरक्षित कॅटेगिरी मध्ये येते आणि हेच कारण आहे की पर्सनल लोन देताना बँकांकडून अधिकचे व्याजदर आकारले जाते.
दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदा च्या पर्सनल लोन ची माहिती पाहणार आहोत. बँक ऑफ बडोदा कडून जर सात वर्ष कालावधीसाठी 11 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरे तर बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक एसबीआय प्रमाणेच आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. एवढेच नाही तर फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेच्या माध्यमातून चांगला परतावा दिला जात आहे.
मात्र बँक ऑफ बडोदा देखील इतर बँकांप्रमाणेच पर्सनल लोन वर अधिक व्याजदर आकारते. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आता आपण बँक ऑफ बडोदा च्या पर्सनल लोन ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदाचे पर्सनल लोनचे व्याजदर
बँक ऑफ बडोदा 11.20% ते 18.25% या व्याजदरात आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे. जे लोक सरकारी कर्मचारी आहेत आणि ज्यांचे बँक ऑफ बडोदा मध्ये अकाउंट आहे अशांना बँकेकडून कमी व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते.
तसेच बँकेकडून ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना देखील कमी व्याज दरात पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँक किमान व्याजदरात पर्सनल लोन देते अशी माहिती समोर आली आहे.
अकरा लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार?
जर तुम्हाला 11.20% या व्याज दारात 11 लाख रुपयांचे कर्ज सात वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर तुम्हाला 18951 रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या काळात 15 लाख 91 हजार 884 बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थातच चार लाख 91 हजार 884 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.