Banking FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या PNB ने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने काही ठराविक कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे.
हे नवीन दर 3 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या बल्क एफडीसाठी लागू राहणार आहेत. खरेतर, ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या देशांतर्गत मुदत ठेवींवर 6% ते 7.50% पर्यंत व्याज देत आहे. PNB नॉन-कॉलेबल एफडीवर 7.05% ते 7.55% दराने व्याज देत आहे.
पंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांना नियमित एफडीवर म्हणजे 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वर 3.50% ते 7.25% दरम्यान व्याज ऑफर करत आहे. तसेच, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 7.75% पर्यंत व्याज ऑफर करत आहे.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने 180 दिवस ते 270 दिवसांच्या कालावधीवरील FD साठी लागू असणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. आधी या कालावधीच्या एफडी साठी 6.65% दराने व्याज दिले जात होते.
पण आता या कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.25% दराने व्याज मिळणार आहे. तसेच या कालावधीच्या नॉन-कॉलेबल एफडीवर 7.30% दराने व्याज दिले जाणार आहे. शिवाय 271 ते 299 दिवस, 300 दिवस, 301 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठीचे व्याजदर देखील सारखेचं ठेवण्यात आले आहेत.
कमी कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बँकेचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 1 वर्षाच्या बल्क एफडीवर सर्वाधिक परतावा दिला जात आहे.
बँकेने या कालावधीच्या बल्क एफ डी साठीचा व्याजदर 7.25% वरून 7.50% केला आहे. बँकेच्या निर्णयाचा बल्क एफ डी करणाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे PNB ने नॉन-कॉलेबल FD साठीचे व्याजदर 7.30% वरून 7.55% पर्यंत वाढवले आहेत. शिवाय बँक 1 वर्षापेक्षा जास्त ते 2 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीवर 6.80% व्याज देत आहे.
पीएनबी ही सरकारी क्षेत्रातील एक मोठी बँक असून यामध्ये अनेक जण फिक्स डिपॉझिट करतात. यामुळे तुम्हालाही येत्या काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत एफडी करायची असेल तर बँकेचा हा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.