Banking News : बँक खातेधारकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सरकारने जनधन योजना राबवल्यापासून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अगदीच खेड्यापाड्यात लोक देखील आता बँकेसोबत जोडले गेले आहेत.
खरे तर तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत सेविंग अकाउंट असेल नाही का, मग बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते ? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल.
याशिवाय, एका व्यक्तीकडून एका दिवसात किती रोख रक्कम घेतली जाऊ शकते ? असाही प्रश्न अनेकांच्या मनात येतो. दरम्यान, आज आपण याच प्रश्नांची उत्तरे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत आरबीआयचे अन आयकर विभागाचे नियम काय आहेत याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
आयकर विभागाचे नियम काय सांगतात?
आयकर नियमांनुसार, एका आर्थिक वर्षात बचत खात्यात दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा केल्यास किंवा खात्यातून काढल्यासं आयकर विभाग अशा खात्यांची पडताळणी करत असते.
तुम्ही तुमच्या सर्व बचत खात्यांमध्ये एका आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर तुम्हाला याबाबत आयकर विभागाला कळवावे लागते.
बँकांना सुद्धा असे व्यवहार उघड करावे लागतात. बँकेच्या एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये असे व्यवहार झालेले असले तरी देखील बँकांना हे व्यवहार उघड करावे लागतात.
आता प्रश्न असा आहे की, एका आर्थिक वर्षात तुमच्या बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड जमा झाल्यास काय होईल? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम उच्च मूल्याचे व्यवहार मानले जातात.
बँका किंवा वित्तीय संस्थांना आयकर कायदा, 1962 च्या कलम 114B अंतर्गत आयकर विभागाला याची माहिती द्यावी लागते. याशिवाय एका दिवसात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागेल.
तुमच्याकडे पॅन नसल्यास, तुम्हाला पर्यायाने फॉर्म 60/61 सबमिट करावा लागतो. तसेच, कलम 269 एसटी नुसार, एखादी व्यक्ती एका दिवसात एकाच व्यवहारात एकाचं व्यक्तीकडून 2 लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम घेऊ शकत नाही.