Besan Making Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले गेले आहे. गत काही वर्षांच्या काळात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
सरकार देखील नवयुवक तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देत आहे. यामुळे भारतात अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि अनेकांना या स्टार्टअप मधून चांगला फायदा होत आहे.
दरम्यान जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे ठरत नसेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण अशा एका बिझनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून महिन्याकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कमाई अगदी सहजतेने करता येणे शक्य आहे.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे बेसन पीठ बनवण्याचा व्यवसाय. खरे तर भारतात स्वयंपाकामध्ये बेसनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी बेसन पीठ आवश्यक असते.
तुम्हाला प्रत्येक घरात बेसन पीठ चा वापर पाहायला मिळेल. भजी, पकोडे, सांबर, करी, बूंदी, बेकरी पदार्थ असे वेगवेगळे पदार्थ बेसन पीठ पासून तयार होतात. हरभऱ्याच्या डाळीपासून बेसन पीठ बनवले जाते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही बेसन बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगली कमाई होणार आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक मशीन खरेदी करावे लागणार आहे.
मशीन साठी तुम्हाला सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागेल. यानंतर मात्र तुम्हाला या व्यवसायासाठी फारसे भांडवल लागणार नाही. विशेष म्हणजे हे मशीन खरेदी करून तुम्ही फक्त बेसनच नाही तर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी अशा विविध धान्यांपासून पीठ बनवू शकणार आहात.
तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे जर असा कारखाना नसेल तर तुम्ही बेसन पीठ बनवण्याचा कारखाना सुरू करून चांगली कमाई करू शकता.
महिन्याकाठी दोन लाखांची कमाई होणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मोठे मशीन खरेदी करावे लागेल आणि या व्यवसायाचा प्लांट सुरू करायचा आहे. २० एचपी क्षमतेच्या यंत्र खरेदी केल्यास तुम्ही प्रत्येक तासाला २२० किलो बेसन तयार करू शकता.
एवढ्या क्षमतेचा प्लांट सुरू केल्यास तुम्ही दिवसाला ८-१० तास काम करून २ टन बेसन तयार करता येते. कानपूरचे अंशुल अरोरा यांनी हा व्यवसाय सुरू केला असून त्यांना यातून लाखो रुपयांची कमाई होत आहे.
अंशुल अरोरा यांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या प्लांट मधून लाखोंची कमाई करत आहेत. ते सांगतात की या व्यवसायातून दिवसाला २ टन बेसन तयार करून विक्री सुरू केल्यास दरमहा २ लाख रुपयांपर्यंत कमाई करता येते. अंशुल यांचे दररोजचे उत्पन्न ७ ते ८ हजार रुपये आहे आणि १ किलो बेसनावर ३ रुपयांपर्यंत नफा मिळतोय.