Allu Arjun Arrested News:- सध्या जर आपण भारतीय सिनेमांचा विचार केला तर यामध्ये सध्या पुष्पा 2 या चित्रपटाची बरीच चर्चा असून हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर यांना प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे व या सिनेमांमध्ये साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांची प्रमुख भूमिका असल्याने या चित्रपटाला आणखीनच महत्त्व प्राप्त झालेले आहे.
परंतु याच पुष्पा 2 चित्रपटाचा नायक साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन च्या बाबतीत मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली असून त्याला हैदराबाद मधील चिक्कडपल्ली पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आली आहे.
गेल्या पाच डिसेंबर रोजी एका प्रकरणामध्ये यासंबंधी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती व त्या आधारे अल्लू अर्जुनला अखेर अटक करण्यात आलेली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन हैदराबाद मधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली असून यामागील जर प्रकरण बघितले तर 4 डिसेंबर रोजी हैदराबाद मधील संध्या या थेटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आलेला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन यांनी देखील हजेरी लावली होती.
साउथ म्हटले म्हणजे अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी त्या ठिकाणी चाहत्यांची एकच गर्दी उडाली या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका 35 वर्षे महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे अल्लू अर्जुन विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
या विरोधात अल्लू अर्जुनने तेलंगणा हायकोर्टमध्ये धाव घेतली होती व हैदराबाद मधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याची त्यांनी मागणी केली होती.या घटनेमध्ये मृत पावलेल्या 35 वर्षीय महिलेच्या 9 वर्षाच्या मुलाला देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
जेव्हा ही घटना चार डिसेंबरला घडली त्यानंतर पाच डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थेटर मॅनेजमेंट विरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या संबंधीची तक्रार मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेली होती.या प्रकरणी पोलिसांच्या माध्यमातून तपास करण्यात आला व या दरम्यान पोलिसांनी थेटर मालकांपैकी एक, थेटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली.
अल्लू अर्जुनने तेलंगणा हायकोर्टात एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल केली होती व याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती देखील केली होती.परंतु त्याची याचिका फेटाळण्यात आली असून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले आहे.
या प्रकरणात काय आहे पोलिसांचे म्हणणे?
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांनी म्हटले की, चित्रपटातील मुख्य अभियंता अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार थिएटरमध्ये येणार असल्याची माहिती थिएटर मॅनेजमेंटने पोलिसांना दिली नव्हती.थेटर व्यवस्थापकांकडून किंवा अल्लू अर्जुन यांच्या टीम कडून मात्र पोलिसांना याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती
व गर्दीला नियंत्रित करण्यासाठी थिएटर मॅनेजमेंटने सुरक्षेबाबत कोणतीही तरतूद केलेली नव्हती.तसेच थिएटर व्यवस्थापनाला कलाकार येणार असल्याची माहिती होती. परंतु तरीदेखील त्यांनी कलाकारांच्या टीम करता वेगळ्या प्रवेशाची किंवा जाण्याची व्यवस्था केली नव्हती असे पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आले.