LIC Scheme : गुंतवणुकीचे अनेक पर्याय आता मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. परंतु बहुतांश लोक सुरक्षित पर्याय शोधत असतात. सुरक्षित व ग्यारंटेड इन्कम हवा असेल तर यासाठी एलआयसी हा उत्तम पर्याय आहे.
LIC ला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पहिले जातेच शिवाय LIC विविध उत्पन्न गटांचा विचार करून अनेक योजना चालवते.
LIC च्या अनेक योजना आहेत. आज याठिकाणी आपण LIC ची एक शानदार योजना आहे त्याबद्दल माहिती पाहुयात. एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन उमंग योजना. या योजनेत गुंतवणूक करून प्रचंड फायदे मिळतील.
येथे तुम्ही जर साधारण अंदाजे 54 रुपयांची बचत केली तर मुदतीनंतर साधारण तुम्ही करून दरवर्षी 48 हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता.
समजा तुमचे वय 25 आहे. तुम्ही 30 वर्षांसाठी जीवन उमंग पॉलिसी 6 लाख रुपयांच्या विमा रकमेसह खरेदी केली असेल तर तुम्हाला महिन्याला 1638 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला दिवसाला 54.6 रुपयांची बचत करावी लागेल.
तुम्ही 55 वर्षांचे व्हाल त्या वेळी मॅच्युरिटी होईल तुम्हाला यात वार्षिक 48 हजार रुपये वयाच्या 100 वर्षापर्यंत मिळत राहतील. विशेष म्हणजे यात तुम्हाला डेथ बेनिफिटचाही लाभ मिळेल.
* जीवन उमंग पॉलिसी बद्दल थोडेसे
LIC द्वारे ही पॉलिसी तुम्हाला विविध बेनिफिट देण्याच्या दृष्टीने सुरु केली आहे. ही एक एंडॉवमेंट पॉलिसी असून यात तुम्हाला विमा संरक्षणासह बचतीचे बेनिफिट देखी मिळतात. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर
ग्राहकांच्या खात्यात दरवर्षी एक निश्चित रक्कम येते. याशिवाय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. ही पॉलिसी 100 वर्षांपर्यंत कव्हरेज देते. अत्यंत फायदेशीर व जास्त बेनिफिट देणारी ही स्कीम आहे.
* नॉन-लिंक्ड स्कीम
एलआयसीची ही योजना एक नॉन-लिंक्ड स्कीम आहे. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही चांगली गुंतवणूक करणं गरजेचं आहे. त्यात जर तुम्ही योग्य व रिस्क नसणारे प्लॅनिंग करत असाल तर ही एलआयसीची ही स्कीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.