Cheapest 7 Seater Car:- प्रामुख्याने कोणतीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा कुटुंबातील सदस्य आणि बजेट त्यानुसार कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेले तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सात सीटर कारला मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.
कारण अशा सात सीटर कारच्या जर आपण किमती पाहिल्या व जागेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या कार मोठ्या कुटुंबासाठी फायद्याच्या ठरतात. तसेच परवडणाऱ्या किमतीत आणि उत्तम मिळणारे मायलेज हे फीचर्स बऱ्याच सात सीटर कारमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
सध्या भारतीय कार बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर सात सीटर कार असून त्यामध्ये किफायतशीर कारची निवड करणे खूप गरजेचे असते. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला देखील कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या लेखात माहिती दिलेल्या दोन कारपैकी एकीची निवड करू शकतात.
या आहेत उत्तम अशा सात सीटर कार
1- किया करेन्स(kia Carens)- कुटुंबासाठी ही कार उत्तम असा पर्याय असून हिच्या मध्ये जागा देखील उत्तम असते. या कारमधील सिटिंग ऍडजेस्टमेंट बघितली तर तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत खूप चांगली जागा उपलब्ध होते. या कारमध्ये सात जण अगदी आरामांमध्ये बसू शकतात.
कियाच्या या कारच्या केबिनमध्ये देखील चांगली जागा आणि बूट स्पेस मिळतो. या कारमध्ये 1.5L GDi पेट्रोल तसेच 1.5L CRDI डिझेल इंजिन देखील देण्यात आलेले आहे.ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये एअरबॅग्स आणि EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे.
या कारची एक्स शोरूम किंमत दहा लाख 45 हजार रुपयांपासून सुरू होते. तुमचा बजेट चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही किया कॅरेन्स ही कार खरेदी करू शकतात.
2- रेनॉल्ट ट्रायबर– तुम्हाला जर कमीत कमी बजेटमध्ये चांगली उत्तम पद्धतीची सात सीटर कार घ्यायची असेल तर तुमच्याकरिता रेनॉल्ट ट्रायबर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या कारमध्ये पाच मोठे आणि दोन छोटे लोक म्हणजे प्रवासी सहजपणे बसू शकतात. या कारमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक प्रकारची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.
जसे की या कारमध्ये आठ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली असून जी एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होते. पावर करिता या कारमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन असून 72 पीएस पावर आणि 96 एनएम टॉर्क देते.
इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज असून या कारचे मायलेज 20 किलोमीटर पर लिटर इतके आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये डीबीटी सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि एअरबॅग सुविधा देण्यात आलेली असून या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.