स्पेशल

अहमदनगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरादरम्यान ब्रॉडगेज मेट्रो धावणार, गडकरींनी दिली ‘ही’ मोठी अपडेट

Broad Gauge Metro : अहमदनगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या शहरा दरम्यान ब्रॉडगेज मेट्रो धावण्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी नितीन गडकरी आणि रत्नागिरीचे पालकमंत्री यांची रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामांबाबत कोल्हापूर विमानतळावर बैठक पार पडली.

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादा दरम्यान नितीन गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रो संकल्पना नागपूर मध्ये राबवली जात असून ही मेट्रो कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-अहमदनगर या दरम्यान देखील धावू शकते असं मत व्यक्त केलं.

यासाठी स्थानिक प्रतिनिधींनी पुढाकार करावा असे देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-अहमदनगर यादरम्यान ब्रॉडगेज मेट्रो संदर्भात त्यांनी गत महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सूचना केली होती. एका रस्ते विकासविषयक बैठकीत ही सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प सध्या अस्तित्वात असलेल्या ट्रॅकवरच उभारता येणे शक्य असल्याचं आणि कमी खर्चात उभारला जाणारा प्रकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, सध्या कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी अति महत्त्वाच्या अशा कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तसेच मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम देखील वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय भविष्यात कोल्हापूर-मिरज मार्गाचेही दुहेरीकरण शक्य असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ब्रॉडगेज मेट्रो’च्या संकल्पनाचा विषय गडकरी यांनी नमूद केला आहे. यां ब्रॉडगेज मेट्रोच्या निमित्ताने कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांनाही मोठ्या प्रमाणात विकासाची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सध्या उभारल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गांच्या पार्श्वभूमीवर ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना गडकरी यांनी उभी केली असून कोल्हापूर-पुणे मार्गावर ती शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे जर लोकप्रतिनिधींनी हा पाठपुरावा केला तर कोल्हापूरमध्ये देखील ब्रॉडगेज मेट्रो धावू शकते असं यावेळी गडकरी यांनी सांगितले आहे. निश्चितच गडकरी यांनी नागपूरच्या धरतीवर उभी केलेली ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विकासाला चालना देणारी राहणार आहे. मात्र यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts