स्पेशल

Budget 2023 : ब्रेकिंग ! देशातील शेतकऱ्यांसाठी श्रीअन्न योजना झाली सुरू ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार का फायदा?, पहा सविस्तर

Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 संसदेत सादर झाले आहे. निर्मला सीतारमन यांनी तब्बल नऊ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान पटकावला आहे. खरं पाहता यावर्षी देशात 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक प्रस्तावित आहे.

अशा परिस्थितीत या बजेटकडे देशवासियांचे विशेष लक्ष लागून होते. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांसमवेतच सर्वांसाठी मोठमोठ्या घोषणा देखील केल्या गेल्या आहेत. कृषी क्षेत्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात श्री अन्न योजना सुरू करण्याची घोषणा देखील केंद्र सरकारने केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशभरात भरड धान्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच श्री धान्य असं भरड धान्याला नाव देण्यात आल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात ज्या ठिकाणी भरड धान्य घेतली जातात त्या भरड धान्यासाठी हब तयार करण्यात येणार असल्याची घोषणा सितारामन यांनी ही योजना सादर करताना केली आहे.

तसेच 2 हजार 516 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात प्राथमिक सहकारी संस्था स्थापन केली जाईल आणि साठवणुकीचे विकेंद्रीकरण केले जाईल असं देखील त्या म्हणाल्या आहेत. एवढेच नाही तर भारतीय शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार असल्याची घोषणा सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना होणार या योजनेचा फायदा

आम्ही सांगू इच्छितो की, भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. यामध्ये राज्यातील धान उत्पादक शेतकरी, ज्वारी आणि बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचा देखील यामुळे फायदा होणार आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे धान उत्पादन घेतले जाते. तसेच सांगली सातारा या भागात ज्वारी आणि बाजरीचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय राज्यातील कोकणात देखील धान उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय इतरही भागात धान पिकवला जातो. अशा शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. तसेच ज्वारी आणि बाजरी या भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फायदा मिळवून दिला जाणार आहे.

पीएम प्रमाण योजना पण झाली सुरु

याशिवाय सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पीएम प्रमाण योजना सुरु करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी २० लाख कोटी रुपये कृषी कर्ज वाटपाचे उदिष्ट्य या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ठेवले आहे.

एवढेच नाही तर तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी प्रवेगक निधी गठित केला जाणार असल्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

याशिवाय ओपन सोर्स, ओपन स्टँडर्ड, इंटरऑपरेबल पब्लिक गुड म्हणून शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जाणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली आहे.

सर्वसमावेशक शेतकरी-केंद्रित उपाय सक्षम केले जातील आणि यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. मार्केट, कृषी उद्योग आणि स्टार्टअप्सला पाठबळ दिले जाणार असल्याचे यावेळी अर्थमंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठी झाल्यात या घोषणा 

  1. ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार
  2. पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचलणार
  3. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवणार, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार
  4. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात कापसापासून सर्वांत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा झाली आहे.
  5. डाळींसाठी विशेष हब तयार केलं जाणार
  6. कृषीसंदर्भातील स्टार्टअपना चालना देणार
  7. पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष दिलं जाणार
  8. पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा
  9. सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य
  10. मत्स विकासासाठी ६ हजार कोटींची तरतूद
  11. हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरसाठी विशेष अनुदान जाहीर
  12. अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार
  13. कृषीपुरक स्टार्टअपना पाठबळ
  14. छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्राधान्य
Ajay Patil

Published by
Ajay Patil
Tags: Budget 2023

Recent Posts