Bullet Train : मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणेच मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ही सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गेली पाहिजे अशी मागणी मतदार संघाच्या नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती.
नागरिकांची हीच मागणी लक्षात घेऊन खासदार रणजीत सिंग नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातून न्या अशी मागणी केली होती. आता खासदार निंबाळकर यांच्या याच मागणीला यश आले असून मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून धावणार आहे.
त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील विकास सुनिश्चित होणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असून या चालू वर्षात देशात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता या बुलेट ट्रेन प्रोजेक्टला गती देण्याचे काम सध्या सुरू आहे. यासोबतच सध्या संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास कामांच्या प्रकल्पांना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना जारी झाल्या आहेत.
आता मुंबई हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला देखील गती लाभणार आहे. खासदार निंबाळकर यांची बुलेट ट्रेन बाबतची मागणी मान्य झाली असल्याने आता ही ट्रेन माळशिरस-अकलूज-पंढरपूर मार्गे सोलापूरहून हैदराबादकडे जाणार असल्याचे फिक्स झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन ला सादर झाला असून या प्रकल्पाचा डीपीआर देखील तयार झाला आहे. विशेष बाब अशी की या प्रकल्पाचा टेक्निकल सर्वे देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आला आहे.
रेल्वे मंडळाकडे हा डीपीआर वर्ग झाला असून आता केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी प्रदान केली जाणार आहे. खासदार निंबाळकर यांनी या प्रकल्पाला कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळेल आणि लवकरच हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होईल अशी आशावाद यानिमित्ताने व्यक्त केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प 711 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई-ठाणे-नवी मुंबई-लोणावळा-पुणे -बारामती-माळशिरस-अकलूज-पंढरपूर-सोलापूर -गुलबर्गा-विक्रबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे.
तसेच या रेल्वे मार्गामध्ये एकूण 11 रेल्वे स्टेशन विकसित केली जाणार आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते हैदराबाद हे अंतर मात्र तीन तासात गाठता येणार आहे. या रेल्वे मार्गावर बुलेट ट्रेन 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. निश्चितच गतिमान बुलेट ट्रेन या पद्धतीने या रुळावर धावेल त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचा विकास देखील जलद गतीने होईल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
जरी बुलेट ट्रेन चा कमाल वेग 350 किलोमीटर प्रतितास असला तरी देखील या बुलेट ट्रेन चा ऍव्हरेज वेग या ठिकाणी 250 किलोमीटर प्रतितास असा राहील असं तज्ञांनी नमूद केल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला मुंबई ते हैदराबाद हा प्रवास करण्यासाठी तब्बल 14 तासांचा कालावधी लागतो मात्र बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेन ने या दोन शहरा दरम्यान मात्र तीन तासात प्रवास करता येणार आहे. म्हणजेच दोन शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तब्बल 11 तासांचा कालावधी या ठिकाणी वाचणार आहे.
यामुळे हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प देशाच्या एकात्मिक विकासाला वाव देणारा सिद्ध होणार आहे. दरम्यान खासदार निंबाळकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने रेल्वे मंत्रालयाने आपली मागणी मान्य केली असल्याने पीएम मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानणार आहेत.