Bullet Train : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा देखील रणसंग्राम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकासाची कामे पूर्णत्वास नेली जात आहेत. आपल्या राज्यातही वेगवेगळी विकास कामे सध्या स्थितीला सुरू असून काही विकास कामांची मुहूर्तमेढ येत्या काही दिवसात रोवली जाणार आहे.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हादेखील महाराष्ट्राच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रोजेक्ट दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. यामुळे या प्रकल्पाला सध्या गती देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील डेपोच्या कामाचे टेंडर 15 मार्च 2023 रोजी खुलणार आहे. याशिवाय डेपोशी अनुषंगिक इतर कामाचा समावेश असलेले टेंडर 26 एप्रिल 2023 रोजी खुलणार आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पाच्या कामाला गती लाभण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत ठाणे जिल्ह्यात डेपो चे स्थानक विकसित होणार आहे. अशा परिस्थितीत या डेपो स्थानकाचे डिझाईन, बांधकाम, सिव्हिल वर्क, बिल्डिंग वर्क यांसंदर्भात 15 मार्च 2023 ला टेंडर खुलणार आहे.
त्याशिवाय डेपोशी संबंधित जे काही इन्स्टॉलेशन, चाचणी, देखभाल सुविधा यांसारख्या बाबींसाठीचे टेंडर 26 एप्रिल 2023 ला खुलणार आहे. निश्चितच, या टेंडर मुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट साठीचा एक महत्त्वाचा टप्पाच्या कामाचा लवकरच शुभारंभ होण्यास मदत होणार आहे.
असा आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रोजेक्टमुळे मुंबई आणि अहमदाबाद ही औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची शहरे परस्परांना थेट जोडली जाणार आहेत. या बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी 508 किलोमीटर इतकी आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये 156 किलोमीटर लांबी या मार्गाची राहणार आहे. निश्चितच या मार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना लागणार आहे.
या बुलेट ट्रेन मार्गाचा मोठा हिस्सा हा गुजरात मध्ये असला तरी यामुळे देशाची आर्थिक राजधानी अन महाराष्ट्राची राजधानी मुंबईचा गुजरातशी थेट कनेक्ट वाढणार आहे. विशेष म्हणजे या बुलेट ट्रेन मुळे गुजरात मध्ये लवकर पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा उद्योग जगताला होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या दोन तास सात मिनिटांत होणार आहे.
स्थानकांवरील थांब्याचा वेळ पकडून एकूण प्रवास दोन तास 58 मिनिटांत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या बुलेट ट्रेन मार्गात एकूण बारा स्थानके राहणार आहेत यापैकी चार स्थानके हे आपल्या महाराष्ट्रात राहतील. या संभाव्य स्थानकांची देखील नुकतीच डिझाईन सार्वजनिक करण्यात आली आहेत. मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल, ठाणे विरार आणि बोईसर या चार ठिकाणी रेल्वे स्थानके या प्रकल्पांतर्गत विकसित होणार आहेत.बोईसर हे महाराष्ट्रातील या बुलेट ट्रेन मार्गाच शेवटचे रेल्वे स्थानक राहणार आहे. गुजरातच्या बाबतीत विचार केला तर गुजरातमध्ये वापी बिल्लीमोरा आणि सूरत तसेच भरूच, वडोदरा, आनंद नडियाद, अहमदाबाद येथे स्थानके या प्रकल्पअंतर्गत उभारले जाणार आहेत. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात मध्ये तीन डेपो आणि महाराष्ट्रात ठाणे येथे एक डेपो विकसित होणार आहे. या बुलेट ट्रेन चे संपूर्ण ऑपरेशनल कंट्रोल साबरमती येथून होणार आहे.
दरम्यान या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाबाबत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात प्रकल्पासाठी चे भूसंपादन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. 98.79 टक्के इतका भूसंपादन या प्रकल्पासाठी आपल्या महाराष्ट्रात झालं असून दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मात्र 100% भूसंपादन या प्रकल्पासाठी झाल आहे.
गुजरात मध्येही भूसंपादन आता अंतिम टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मध्ये 98.91% इतकं भूसंपादन या प्रकल्पासाठी झाल आहे. निश्चितच या प्रकल्पाचे येत्या काही दिवसात प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याच टार्गेट ठेवल असून 2024 अखेर या प्रकल्पाची दोन महत्त्वाचे टप्पे पूर्ण होणार असल्याचे केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगितले जात आहे.