Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य मिळत आहे. नऊ ते पाच अशा रुटीन लाईफला अनेकजण कंटाळले असून आता नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे तरुण वर्ग अधिक वळत आहे. मात्र तरुणांना नेमका कोणता व्यवसाय सुरू केला पाहिजे याबाबत कोणतीच कल्पना नसते.
यामुळे अनेकदा तरुणांचे नुकसान देखील होते. पण जर तरुणांनी मार्केटचे व्यवस्थित अध्ययन केले आणि त्यानुसार त्यांना सूटेबल असा व्यवसाय निवडला तर त्यांना निश्चितच बिजनेस मधून लाखो रुपयांची कमाई होऊ शकणार आहे. यामुळे आज आपण मिनरल वॉटरचा व्यवसाय कसा सुरू केला जाऊ शकतो याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर बाजारात बाटलीबंद बॉटल्स उपलब्ध असतात. शिवाय पाऊच देखील मिळते. मात्र असे असले तरी आजही मोठ्या शहरांमध्ये घरात, शॉपमध्ये पिण्यासाठी वीस लिटरच्या जारलाच मागणी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर मिनरल वॉटर प्लांट टाकून तुमच्या आजूबाजूच्या लोकांना फिल्टर पिण्याचे पाणी पुरवू शकता.
25 रुपये प्रति जार याप्रमाणे तुम्ही हे पाणी विकू शकता. जर तुमचे 150 नियमित ग्राहक असतील आणि ते दररोज एक जार घेत असतील तर 25 रुपये प्रति जारप्रमाणे महिन्याकाठी तुम्हाला एक लाख बारा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. दरम्यान, यातून सर्व खर्च वजा जाता तुम्हाला जवळपास 20 ते 30 हजार रुपयांचा नफा राहू शकतो.
यामुळे निश्चितच हा मिनरल वॉटरचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता आपण या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागू शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती गुंतवणूक करावी लागेल
या व्यवसायासाठी तुम्हाला 1000 ते 1500 स्क्वेअर फिटची जागा लागणार आहे. पाण्यासाठी तुम्हाला बोअर करावा लागणार आहे. किंवा विहिरीचे पाणी देखील यासाठी उपयोगी येते. यासाठी तुम्हाला आरो प्लांट तयार करावा लागणार आहे.
यासोबतच पाणी थंड करण्यासाठी तुम्हाला चिलर देखील घ्यावे लागणार आहे. तसेच तुम्हाला 20 लिटरचे जार देखील घ्यावे लागणार आहेत. यासोबतच तुम्हाला वीस लिटरचा बाटला देखील घ्यावा लागणार आहे. शंभर जार आणि शंभर बाटला लागू शकतात. म्हणून यासाठी जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो.
व्यवसायाचा परवाना काढावा लागणार
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाचा तुम्हाला परवाना काढावा लागणार आहे. कंपनी कायद्यांतर्गत व्यवसायाची नोंदणी करावी लागणार आहे. व्यवसायाचा पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांक वेगवेगळ्या कारणांसाठी लागतो यामुळे ही सारी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.