Business Success Story:- आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या गोष्टीत काम करणे हे यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये असे अनेक यशस्वी लोक दिसून येतात की, त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले असते आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर ते काम करत असतात.
परंतु डोक्यामध्ये त्यांना वेगळेच काहीतरी करण्याच्या संदर्भात विचार सुरू असतात व त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात. अशा आवडीच्या कामामुळे चांगल्या पगाराची नोकरी सोडतात व एखाद्या व्यवसायामध्ये उडी घेऊन अखंड कष्ट आणि प्रयत्नच्या जोरावर यशस्वी होतात.
त्याला धरून जर आपण जयपूर येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले कपिल गर्ग यांची यशोगाथा पाहिली तर इतर तरुणांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रेरणा देणारी आहे. या व्यक्तीने इंजिनीयरची नोकरी सोडली आणि रंगीबेरंगी मोजे विकण्याचा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये अनन्यसाधारण असे यश मिळवले आहे.
कपिल गर्ग यांची यशोगाथा
कपिल गर्ग हे जयपूर येथील राहणारे असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत व त्यांनी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जवळपास आठ वर्ष काम केले. परंतु या नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व रंगीबिरंगी मोजे विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. या सगळ्या कल्पनेमध्ये कपिल यांना त्यांची पत्नी विधी यांची मोलाची साथ मिळाली.हा व्यवसाय सुरू करण्याकरिता त्यांनी 2018 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली व व्यवसायाला सुरुवात केली.
2018 मध्ये कपिल यांनी ठेला गाडी नावाच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली व त्यानंतर कपिल गर्ग यांनी मागे वळून पाहिले नाही. ठेला गाडी म्हणजेच TG हा असा ब्रँड आहे की तो परवडणाऱ्या किमतीमध्ये मनोरंजक अशा फॅशन ॲक्सेसरीज विकण्याचे काम करतो. या व्यवसाय सुरू करण्यामागील जर कपिल यांचे प्रेरणा पाहिली तर बऱ्याचदा ते जेव्हा बाजारामध्ये कपडे घ्यायला जायचे तेव्हा मिळणारे कपडे आणि ॲक्सेसरीज त्यांना खूप कंटाळावाणे वाटायचे.
त्यामुळे त्यांना काहीतरी नवीन आणि मजेशीर लोकांना द्यावे असे वाटायचे व त्या प्रेरणातूनच त्यांनी सुरुवातीला लहान मुलांसाठी आणि प्रौढ व्यक्तींकरिता कार्टून चित्रांसह रंगीबेरंगी मोजे डिझाईन करायला सुरुवात केली व त्यांच्या या उत्पादनांच्या यादीमध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश केला. रंगीबिरंगी मोजे यांच्यासोबत बॉक्सर शॉर्ट्स, नोट बॅग आणि रुमाल तसेच डोळ्यांचे मास्क इत्यादी उत्पादनांचा देखील समावेश केला.
2022-23 कपिल यांनी कमावले 1.8 कोटी रुपये
आज त्यांच्या ठेला गाडी या कंपनीकडे 110 पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने असून त्या उत्पादनांची प्राईज रेंज पाहिली तर ती साधारणपणे 59 रुपयांपासून ते 799 पर्यंत आहे. हे सगळे उत्पादने त्यांची वेबसाईट किंवा ॲमेझॉन इंडिया वरून खरेदी करता येणे शक्य आहे.
जर आपण Inc42 नुसार बघितले तर हँड कार्टने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1.8 कोटी रुपये कमावले व 2024 पर्यंत 5.5 कोटी रुपये कमावण्याचे कंपनीचे टार्गेट आहे. याकरिता जास्तीत जास्त प्लॅटफॉर्मवर आणि दुकानांवर उत्पादने विकण्याची कंपनीची योजना आहे.
कशी सुचली या व्यवसायाची कल्पना?
एकदा कपिल आणि विधी गर्ग हे ट्रिप साठी थायलंड येथे गेलेले होते. त्या ठिकाणी फिरत असताना त्यांनी अनेक मोठी माणसे पाहिली की त्यांनी स्टायलिश मोजे परिधान केलेले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भारतामध्ये अशा प्रकारचे रंगीबिरंगी स्टायलिश मोजे फक्त लहान मुले वापरतात. तसेच या प्रकारचे परदेशी ब्रँड बघितले तर ते अतिशय महाग होते व त्यांचा दर्जा देखील इतका चांगला नव्हता.
त्यामुळे त्यांनी ठरवले की अशाच चांगल्या दर्जाच्या फॅशनेबल ॲक्सेसरीज थेट लोकांना परवडतील अशा किमतींमध्ये उपलब्ध करून देणे व त्यामुळेच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात मोजे म्हणजे सॉक्स पासून केली व आज त्यांच्या प्रोडक्ट मध्ये अनेक गोष्टी त्यांनी जोडले आहेत.