स्पेशल

Business Success Story: घराच्या गच्चीवर केली व्यवसायाला सुरुवात! आज त्याच व्यवसायातून हा तरुण करत आहे कोट्यावधीची उलाढाल

Business Success Story:- माणसांमध्ये जबर इच्छाशक्ती आणि जी गोष्ट मनामध्ये ठरवलेली आहे ती पूर्ण करण्याचा ध्यास व त्यासाठी करावी लागणारी मेहनतीची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होतो.

तसेच यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अपयशाचे डोंगरे पार करावे लागतात व त्यासोबत उद्भवलेली विपरीत परिस्थितीशी दोन हात करत त्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाच्या दिशेने वाटचाल करावी लागते तेव्हा कुठे व्यक्ती यशस्वी होत असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण केशव राय यांचा विचार केला तर कायम डोक्यामध्ये काहीतरी व्यवसाय करावा हा विचार असणारा तरुण व अभ्यासात मात्र सरासरी विद्यार्थी होता व अभ्यासाकडे फारसे लक्ष देखील नव्हते.

परंतु कुठलातरी चांगला व्यवसाय करून आर्थिक प्रगती करावी हा विचार मात्र कायम डोक्यात होता. केशव राय यांनी नुसता विचारच केला नाही तर त्या दिशेने वाटचाल केली व आज छोट्याशा व्यवसायाची सुरुवात करून तोच व्यवसाय कोट्यावधीच्या घरात पोहोचवला.

 केशव राय यांनी अशा पद्धतीने केली व्यवसायाला सुरुवात

अभ्यासात आणि शाळेत लक्ष नसल्यामुळे आणि डोक्यात कायम कुठलातरी व्यवसाय करावा हे सतत चालू राहत असल्यामुळे केशव राय यांनी 2015 मध्ये एक एप्लीकेशन आधारित व्यवसाय करायचा ठरवला व त्याकरिता वडिलांकडून पैसे मागितले.

परंतु हा व्यवसायामध्ये केशव राय अपयशी झाले. परंतु या अपयशामुळे खचून न जाता काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास कायम मनात असल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला सुरुवात केली.

 याप्रसंगी घर सोडण्याचा घेतला निर्णय

पहिल्या ॲप आधारित व्यवसायामध्ये  सपशेल अपयश आल्यानंतर मात्र आता घरी न बसता काहीतरी करावे या उद्देशाने बॅग भरली व घर सोडायचे ठरवले व घर सोडले देखील. त्यानंतर मात्र डोक्यात कुठलीही कल्पना नसताना देखील तीन दिवस रस्त्यांवर फिरून चौथ्या दिवशी परत घरी जावे हा विचार सुरू असताना दिल्ली शहरातील कौशंबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंग मध्ये केशव राय बसलेले होते.

त्या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये एक माणूस त्याची बाईक साफ करण्यासाठी धुळीचे फॅब्रिक शोधत होता. परंतु त्याला ते मिळाले नाही व त्या माणसाने शेजारील बाईकचे डस्टर घेतले व स्वतःची बाईक स्वच्छ करून तो निघून गेला.

ही सगळी परिस्थिती केशव यांनी पाहिली व तेव्हाच त्यांच्या डोक्यामध्ये एक बिझनेस आयडिया आली व तीच आयडिया घरी येऊन त्यांनी वडिलांना सांगितली. केशव राय यांची ती व्यावसायिक कल्पना होती बाईकचे कव्हर बनवणे हे होय. वडिलांना देखील ही कल्पना आवडली व केशव यांना पाठिंबा दर्शवला.

 अशा पद्धतीने झाली बाईक ब्लेझरची सुरुवात

त्यानंतर व्यवसायामध्ये दुसरा प्रयत्न करण्याचा केशव यांनी निर्णय घेतला व 2016 च्या सुरुवातीला बाईक ब्लेझरची सुरुवात केली. या व्यवसायाची सुरुवात करताना अगदी घराच्या गच्चीवरून सुरुवात केली व बाईकच्या कव्हरचे उत्पादन सुरू केले. आज त्यांच्या या कंपनीचे नवी दिल्ली आणि गाजियाबाद या ठिकाणी दोन उत्पादन युनिट आहेत.

त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती देताना केशव म्हणतात की, बाईकचे कव्हर औद्योगिक दर्जाच्या नायलॉन नफेटा म्हणजेच पॅराशुट फॅब्रिक पासून बनवले आहे व जे हवामानास प्रतिरोधक आहे. तसेच हे कव्हर पावसाळ्यानंतर साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी आणि आतील भाग कोरडे करण्यासाठी सक्षम आहे.

बाईक ब्लेझर मध्ये दुचाकीचे पार्किंग कव्हर येते व ते पाण्याला प्रतिरोधक आहे व वाहनांना धुळीपासून देखील वाचवते.हे यंत्र वाहनावर लावून बाईक किंवा कारला अगदी 30 सेकंदापेक्षा कमी वेळेत कव्हर घालून देते असे देखील त्यांनी सांगितले.

केशव राय यांनी घराच्या गच्चीवरून सुरू केलेल्या या बाईक ब्लेझर व्यवसायाची 2021 च्या आर्थिक वर्षात उलाढाल ही एक कोटी तीन लाखापर्यंत झालेली होती.

अशाप्रकारे मनात इच्छा असली व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची ताकद राहिली तरी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होतो हे आपल्याला दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts