Top CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आता ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार व त्यासोबतच हायब्रीड कार उत्पादित केल्या जात आहेत.
पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत जर सीएनजी कार्स बघितल्या तर त्यांची एकंदरीत रनिंग कॉस्ट खूप कमी आहे. त्यामुळे सीएनजी कार वापरायला देखील परवडतात व लांबच्या प्रवासासाठी त्या फायद्याच्या ठरतात.
भारतामध्ये अनेक दिग्गज अशा कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सीएनजी कार तयार करण्यात आलेले आहेत व देशातील त्यांची विक्री देखील तितकीच मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे तुम्हाला देखील जर या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सीएनजी कार विकत घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाचे आणि प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या सीएनजी कारबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.
या आहेत भारतातील बेस्ट सीएनजी कार
1- मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी– सप्टेंबर महिन्यामध्ये देशात सर्वाधिक विक्री झालेली मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी ही एक महत्त्वाची कार असून या कारची एक्स शोरूम किंमत दहा लाख 78 हजार रुपयांपासून ते अकरा लाख 88 हजार रुपये पर्यंत जाते.
2- टाटा नेक्सन सीएनजी– टाटा मोटर्सच्या माध्यमातून स्टायलिश अशा एसयूव्ही नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले. टाटा नेक्सन सीएनजीची एक्स शोरूम किंमत 8.99 लाखापासून सुरू होते व 14 लाख 59 हजार रुपये पर्यंत जाते.
3- मारुती सुझुकी बलेनो सीएनजी– मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक बलेनो हे देखील सीएनजी व्हेरिएंट मधील उत्कृष्ट अशी कार असून तिची एक्स शोरूम किंमत आठ लाख 40 हजार रुपयांपासून सुरू होते आणि नऊ लाख 33 हजार रुपये पर्यंत जाते.
4- मारुती स्विफ्ट सीएनजी– मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील सगळ्यात जास्त विकली जाणारी हॅचबँक कार असून या कारचे तीन सीएनजी प्रकार आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख वीस हजार ते नऊ लाख वीस हजार रुपये इतकी आहे.
5- टाटा पंच सीएनजी– टाटा पंच सीएनजी ही टाटा मोटरची सगळ्यात जास्त विक्री होणारी कार असून या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख तेवीस हजार रुपये ते दहा लाख पाच हजार रुपये इतकी आहे.
6- टोयोटा अर्बन क्रूजर टायझर सीएनजी– टोयोटा कंपनी देखील कार उत्पादक क्षेत्रामध्ये अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची लोकप्रिय क्रॉस ओव्हर अर्बन क्रुझर टायझर या सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 71 हजार रुपये इतकी आहे.
7- ह्युंदाई एक्सेटर सीएनजी– ह्युंदाई मोटर इंडियाची ही सर्वात स्वस्त एसयूव्ही कार म्हणून ओळखले जाते. ह्युंदाई मोटर्सची स्वस्त असलेल्या एसयूव्ही व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत आठ लाख 43 हजार रुपये ते नऊ लाख 38 हजार रुपये पर्यंत आहे.
8- मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी– मारुती सुझुकीच्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारपैकी ही एक सीएनजी कार असून मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची एक्स शोरूम किंमत 6 लाख 74 हजार रुपये इतकी आहे.
9- मारुती सुझुकी ब्रेझा– देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून मारुती सुझुकी ब्रेझ्झा सीएनजी ओळखली जाते.या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 29 हजार ते बारा लाख 36 हजार रुपये इतकी आहे.