जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळणे देखील खूप गरजेचे असते. त्यामध्ये आपण स्वतःजवळ रोख रक्कम किती वाढवू शकतो किंवा बँकेच्या बचत खात्यामध्ये किती रक्कम ठेवू शकतो इत्यादी बद्दल अनेक प्रकारचे नियम आहेत.
अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा सोने खरेदी करायला जातो तेव्हा ते सोने खरेदी करताना देखील काही कायदेशीर गोष्टी आपल्याला पाळणे गरजेचे असते किंवा अशा काही बाबी आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघू.
ज्वेलरी शॉपमधून कॅशमध्ये किती सोने घेता येते?
यामध्ये जर आपण इन्कम टॅक्स कायदा बघितला तर तुम्ही कॅशमध्ये सोने खरेदी करत असल्यास किती रकमेचं सोनं घेत आहेत याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. परंतु या स्वरूपाचे बंधन मात्र सोनाराला नक्कीच आहे. कारण सोनाराला एका ठराविक रकमेच्यावर रोकड स्वरूपामध्ये पैसे स्वीकारण्यावर बंधन आहे.
आपल्या भारतामध्ये सहसा सणासुदीच्या किंवा लग्नकार्याच्या प्रसंगी सोने खरेदीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. अशावेळी सोनाराच्या दुकानात म्हणजे ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन सोने खरेदी केले जाते. परंतु यामध्ये इन्कम टॅक्स कायद्यानुसार पाहिले तर एकाच व्यवहारासाठी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोकड स्वरूपात स्वीकारण्यास सोनारावर निर्बंध आहेत.
त्यामुळे ग्राहक कितीही रकमेचे सोने जरी खरेदी करत असेल तरी त्याची विक्री करताना सोनाराला मात्र प्रत्येक एका व्यवहारासाठी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यास कायद्याने म्हणायचे आहे.
त्यामुळे सोनाराला सोन्याची विक्री करताना ही नियमानुसारच करणे गरजेचे आहे. जर सोनाराने दोन लाख रुपयापेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारली तर इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून त्यानुसार तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे स्वीकारलेल्या रकमेवर दंड देखील आकारू शकतो.
दोन लाखांच्यावर व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक
जर आपण याबाबत तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करत असाल तर मात्र इथे तुम्हाला पॅन कार्ड,आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागणार आहे.
परंतु तुम्ही खरेदी करत असलेले सोने हे दोन लाखापेक्षा कमी किमतीचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्डची गरज लागणार नाही. त्यामुळे तुम्ही दोन लाखाच्या आत कॅशमध्ये सोने खरेदी करू शकणार आहात.
सोने खरेदीसाठी डिजिटल गोल्डचा पर्याय ठरेल फायद्याचा
समजा तुम्हाला लग्नकार्यासाठी सोने घ्यायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर याबाबत तज्ञ म्हणतात की प्रत्यक्ष सोने खरेदी करणे ऐवजी सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. या माध्यमातून तुम्हाला परतावा देखील चांगला मिळेल.
कारण या गोल्ड बॉडच्या इशू प्राईज वर दरवर्षी 2.50% व्याज दिले जाते. तसेच या डिजिटल सोने खरेदीमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला यावर जीएसटी किंवा कुठल्याही प्रकारचा मेकिंग चार्ज देखील द्यावा लागत नाही. त्यामुळे तुमचा पैसा यामध्ये वाचतो.
परंतु तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करता तेव्हा तुम्हाला जीएसटी भरावा लागू शकतो. त्याऐवजी तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याज देखील मिळते व तुम्ही या गोल्ड बॉण्डमध्ये वैयक्तिक चार किलो पर्यंत सोने खरेदी करू शकता.