सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आपल्याला वाहन बाजारपेठेत दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर इलेक्ट्रिक कार पर्यंत अनेक वाहने लॉन्च केली जात आहेत. तसे पाहायला गेले तर इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड हा अनेक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील आता अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या बद्दल मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. अगदी या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिले तर आता भारतामध्ये चायनीज इलेक्ट्रिक कार उत्पादक बिवायडीने आपल्या
ATTO 3 SUV चा परवडणारा प्रकार लवकरच लॉन्च करण्याची तयारी केली असून या कंपनीच्या माध्यमातून सोशल मीडियावर या कारचा नवीन व्हेरीएंटचा टिझर देखील जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार भारतामध्ये 10 जुलै 2024 रोजी लॉन्च केली जाणार आहे.
तीन प्रकारांमध्ये आहे ही कार
या कंपनीच्या माध्यमातून चीनमध्ये
जे मॉडेल लॉन्च केले जाणार आहे त्यामध्ये 60.48 kWh चा बॅटरी पॅक असून तो एका चार्जमध्ये 521 km ची रेंज देण्यास सक्षम आहे. परंतु यामध्ये एक लहान बॅटरी पॅक देखील असणार आहे व तो एका चार्जवर 450 किमीची रेंज देईल. जर आपण BYD ATTO 3 चा आतील भाग पहिला तर तो अतिशय आकर्षक असून यामध्ये स्टेरिंग व्हील आणि सर्व कंट्रोल्सवर बिवायडी लोगोसह ADAS चा पर्याय देखील असणार आहे.
ADAS मध्ये स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन कीप असिस्ट, अडॅपटिव्ह क्रूज कंट्रोल आणि फ्रंट रियर कोलीजन अलर्टचा समावेश असणार आहे. तसेच या एन्ट्री लेवल कारमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर असणारा असून जी 150 kW वर 201 बीएचपी पावर आणि तीनशे दहा एनएम टॉर्क देते.
किती असेल या कारची किंमत?
या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची किंमत सध्या चीनमध्ये तेहतीस लाख 99 हजार रुपये असून या नवीन एन्ट्री लेवल व्हेरियंटची भारतातील किंमत सुमारे 26 लाखापासून ते 28 लाखापर्यंत असू शकते असे म्हटले जात आहे.
भारतामध्ये लॉन्च होणाऱ्या या कारमध्ये असलेल्या लहान बॅटरी पॅकमुळे तिची किंमत आणखीन कमी असू शकते. भारतामध्ये या कारची स्पर्धा टाटा हॅरियर इव्ही, ह्युंदाई क्रेटा ईव्ही इत्यादी कारशी असण्याची शक्यता आहे. जी पुढच्या वर्षी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.