स्पेशल

शिर्डीजवळील अस्तगावच्या शेतकऱ्याला निवडुंगाने केले करोडपती! वाचा कसे केले या तरुण शेतकऱ्याने शक्य?

पारंपरिक शेतीला फाटा देत भाजीपाला आणि फळबागा सारख्या पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरताना दिसून येत आहे. एवढेच नाही तर आता बरेच शेतकरी जिरेनियम, अनेक औषधी वनस्पतींची लागवड तसेच ड्रॅगन फ्रुट लागवडीतून देखील आता मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती साधत आहेत.

अनेक प्रयोगशील शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. तसेच शेतीला धरूनच काही महत्त्वाच्या व्यवसायाच्या माध्यमातून देखील आता शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे.

अगदी याच प्रमाणे जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील अस्तगाव येथील सतीश अत्रे या तरुणाचा विचार केला तर या शेतकऱ्याने पारंपारिक शेती पद्धत आणि पारंपारिक पिकांना तिलांजली देत निवडुंग शेतीमधून करोडपती होण्याची किमया साध्य केली आहे.

 सतीश अत्रे यांना निवडुंग शेतीने केले करोडपती

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ असलेले अस्तगाव हे प्रामुख्याने नर्सरीचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावचे तरुण शेतकरी सतीश अत्रे यांनी काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने निवडुंग शेतीला प्राधान्य देत हे शेती यशस्वी केली व अस्तगाव चे नाव थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची कामगिरी पार पाडली आहे.

सतीश अत्रे यांनी निवडुंगावर अभ्यास केला व या वनस्पतीची देश आणि विदेशातील रोपे मिळवली व नर्सरीमध्ये वाढवली. अत्रे यांनी त्यांच्या नर्सरीमध्ये वाढवलेल्या निवडुंगाला अनेकांनी पसंती दिली. याच काटेरी निवडुंगाणे त्यांना आज करोडपती बनवले आहे.

 निवडुंगाच्या माध्यमातून कसे झाले करोडपती?

सतीश अत्रे यांनी निवडुंग या वनस्पतीचा व्यवस्थित अभ्यास केला व त्याच्या रोपांची साठवण करत पंधरा वर्षांपूर्वी नर्सरी उभारली व त्यामध्ये अनेक प्रकारची फळ तसेच फुल झाडे व औषधी वनस्पती सोबतच विदेशातील काही निवडुंगाच्या रोपांची देखील लागवड केली. त्यावर त्यांनी अफाट असे संशोधन देखील केले आहे. त्यांचा हा अभ्यास व कामाला गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये सर्वप्रथम यश मिळाले.

आपल्याला माहित असेल की भारतातील सर्वात उंच असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे म्हटले जाते. त्यांच्या या पुतळ्याच्या बाजूस असणाऱ्या 40 एकर जागेमध्ये  गार्डन स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी गार्डन बनवण्यासाठी सतीश अत्रे  यांना एका संस्थेने बोलावले व पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून देखील त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

ही जबाबदारी सतीश यांनी स्वीकारली व खेड्यातील या तरुणाने गुणवत्तेच्या जोरावर लँडस्कॅपिंग डिझाईन बनवले व स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी गार्डन तयार करण्याचे टेंडर मिळवण्यात यशस्वी झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गार्डनमध्ये निवडुंगाची दोन एकर क्षेत्रामध्ये बाग असावी अशी इच्छा व्यक्त केली होती व सतीश अत्रे यांनी हे आव्हान स्वीकारले.

साधारणपणे 2018 पासून त्यांनी हे काम सुरू केले व तेव्हापासून चाळीस एकर जागेत अनेक गार्डन बनवली. या गार्डनमध्ये 2000 विदेशातील फुलांची झाडे तसेच दीड हजार पेक्षा जास्त निवडुंगाची रोपांचा यामध्ये समावेश केला.

अखंड मेहनत आणि टॅलेंट च्या जोरावर सतीश अत्रे यांनी कोट्यावधी रुपये देखील या माध्यमातून मिळवले व इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असे काम देखील करून दाखवले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts