स्पेशल

‘या’ बँकेच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेतून गुंतवणूकदारांना मिळणार जबरदस्त परतावा! 5 लाख टाकलेत तर किती मिळणार ? वाचा….

Central Bank FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत आहेत. पूर्वी महिलावर्ग सोन्या-चांदीच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करत. मात्र आता गुंतवणुकीचा ट्रेंड पूर्णपणे शिफ्ट झाला आहे.

आता गुंतवणूक फिक्स डिपॉझिट सारख्या सुरक्षित योजनांमध्ये अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. काहीजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी देखील गुंतवणूक करतात.

मात्र आजही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात असून सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे फिक्स डिपॉझिट चा. त्यामुळे जर तुम्ही ही येत्या काही दिवसांनी फिक्स डिपॉझिट मध्ये तुमच्याकडील पैसे गुंतवण्याचा तयारीत असाल तर बँकेची पायरी चढण्या आधी आजची ही बातमी पूर्ण वाचा.

आज आपण फिक्स डिपॉझिट मध्ये सर्वोत्कृष्ट व्याज ऑफर करणाऱ्या देशातील एका बड्या बँकेची माहिती पाहणार आहोत. आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 444 दिवसांच्या फिक्स डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक आहे. इतर सरकारी बँकांच्या तुलनेत ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर अधिकचा व्याज देत असल्याचा दावा होतोय. ही बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी साठी 3.50 टक्क्यांपासून ते 7.45% पर्यंतचे व्याज ऑफर करत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 444 दिवसांची एफडी योजना कशी आहे?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून ऑफर केले जाणाऱ्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांना 7.45% या दराने व्याज दिले जात आहे महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीच्या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या जेष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50% अधिकचे व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून 7.95% या दराने व्याज दिले जात असल्याची माहिती बँकेकडून हाती आली आहे.

5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 444 दिवसांच्या FD योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर सामान्य ग्राहकांना 7.45% या दराने पाच लाख 46 हजार 973 रुपये दिले जाणार आहेत.

म्हणजे गुंतवणूकदाराला 46,973 रुपये फक्त व्याज म्हणून मिळणार आहेत. जर समजा याच कालावधीच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना 7.95% या दराने पाच लाख 50 हजार 247 रुपये मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts