स्पेशल

धक्कादायक ! हरभऱ्याला हमीभावापेक्षा ‘इतका’ कमी दर मिळतोय; आगामी काळात दरवाढ होणार की नाही? वाचा….

Chana Rate : सरकार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपक्रम सुरू असल्याचे सांगत आहे. सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल हा किमान आधारभूत किमतीत खरेदी केला जात आहे.

मात्र सध्या बाजारात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. हरभरा बाजारात हमीभावापेक्षा जवळपास 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल कमी दरात विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसं होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान हरभऱ्याच्या दरात घसरण होण्यामागे तज्ञांनी काही कारणे अधोरेखित केली आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडे हरभऱ्याचा पंधरा लाख टनाचा साठा शिल्लक होता. हा शिल्लक साठा आणि आत्तापर्यंत नाफेडच्या माध्यमातून 23 लाख टन हरभरा खरेदी करण्यात आली आहे. 

हे पण वाचा :- देशातील समुद्राखालील पहिला बोगदा महाराष्ट्रात; ‘इतक्या’ वर्षात काम होणार पूर्ण, 21 किलोमीटर लांबी, 6397 कोटींचा खर्च, कसा राहणार रूटमॅप

म्हणजेच नाफेडचा साठा आता जवळपास 38 लाख टनांवर पोहोचला आहे. यामुळे हा स्टॉक पुढील काळात बाजारात विक्रीसाठी दाखल होणार हे फिक्स आहे. अशा परिस्थितीत, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सध्या हमीभावापेक्षा कमी दरात हरभऱ्याची खरेदी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणजेच सरकार जरी नाफेडच्या माध्यमातून हमीभावात हरभरा खरेदी करत असली तरी देखील याचा दबाव हा बाजारावर जाणवत आहे. याच दबावामुळे सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.

सध्या हरभऱ्याचे दर चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. सरकारच्या अंदाजानुसार यंदा हरभऱ्याचे 135 लाख टन उत्पादन झाले. 

हे पण वाचा :- मराठमोळ्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! ‘या’ पद्धतीने गुलाब फुल शेती सुरु केली, वर्षभरात झाली लाखो रुपयांची कमाई, वाचा ही यशोगाथा

यापैकी नाफेड ने 23 लाख टन हरभरा खरेदी केला. उर्वरित हरभरा साहजिकच शेतकऱ्यांना कमी दरात विकावा लागला आहे. सध्या तर MSP पेक्षाही कमी भाव हरभऱ्याला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

विशेष बाब म्हणजे आगामी काळातही हरभऱ्याचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे. कारण की शासनाकडे यंदाचा 23 लाख टनाचा साठा आणि गेल्यावर्षीचा 15 लाख टनाचा शिल्लक साठा असा मिळून 38 लाख टनाचा साठा शिल्लक आहे.

यामुळे हा माल भविष्यात खुल्या बाजारात विक्रीसाठी येणार आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात हरभरात दरावरील दबाव कायम राहण्याची परिस्थिती असल्याचे मत काही जाणकार लोक व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा :- बीआरएसचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा ‘इतक्या’ विक्रमी भावात तेलंगणात विक्री करणार, वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts