स्पेशल

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर

Chheda Nagar Junction : मुंबई आणि ठाणे वासियांसाठी एक मोठी खुशखबर हाती येत आहे. खरं पाहता, मुंबई आणि ठाण्यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

याच प्रयत्नाचा भाग म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन नवीन पूल मुंबईमध्ये तयार केले जात आहेत. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एम एम आर डी ए ने तीन नवीन पूल तयार करण्याचे नियोजन आखले आहे.

हे पण वाचा :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार…

छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पांतर्गत हे तीन नवीन फोटो तयार केले जात आहेत. यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जातो. दरम्यान आता या तीन पुलांपैकी एका पुलाचे काम हे गेल्या वर्षी पूर्ण झाले असून उर्वरित दोन पुलांपैकी एका पुलाचे काम अंतिम टप्प्यात झाले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या तिहेरी पुलाचे काम 2018 मध्ये सुरू करण्यात आले. यापैकी एका पुलाचे काम 2022 मध्ये पूर्ण झाले. आता दुसऱ्या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, संभाजी नगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, बीडसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार !…

कसा आहे हा प्रकल्प

पहिला उड्डाणपूल हा छेडा नगर आणि अमर महाल येथे कनेक्टेड राहणार असून या मार्गाची लांबी 650 मीटर आहे. हा दोन मार्गे घ्यायचा फुल असून यासाठी 52 कोटींचा खर्च झाला आहे. हा पूल 2022 मध्ये सुरू झाला आहे.

दुसरा मार्ग छेडा नगर जंक्शन इंडियन ऑईल ते गोरेगाव मुलुंड लिंक रोड ते ठाणे ते ईस्टर्न एक्सप्रेस वे हायवे असा आहे. याची लांबी 1.2 किलोमीटर एवढी असून हा दोन लेनचा मार्ग आहे. यासाठी 94 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा पूल एप्रिल 2023 मध्ये सुरू केला जाणार आहे.

तिसरा पूल अमर महाल ते विक्रोळी असा राहणार आहे. तिसऱ्या मार्गाची लांबी 680 मीटर असून हा तीन मार्गिकेचा पूल राहणार आहे. यासाठी 58 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दुसरा पूल म्हणजेच छेडा नगर जंक्शन इंडियन ऑईल ते गोरेगाव मुलुंड लिंक रोड ते ठाणे ते ईस्टर्न एक्सप्रेस वे हायवेपर्यंतचा पूल एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. यामुळे छेडानगर जंक्शन मधील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! पहा काय घोषणा केली सरकारने

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts