Cibil Score : आपल्यापैकी अनेकांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागतं. कर्ज घेण्यासाठी मात्र सिबिल स्कोर अतिशय आवश्यक घटक ठरतो. बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी सिबिल स्कोर चेक करतात. जो की 300 ते 900 दरम्यान गणला जातो. हा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर आपल्या कर्जाचा इतिहास सांगत असतो. जर क्रेडिट स्कोर हा अधिक असेल म्हणजे 750 पेक्षा अधिक तर अशा व्यक्तींचा कर्जाचा इतिहास चांगला राहतो.
म्हणजेच अशा व्यक्तींनी कर्जाची वेळेवर परतफेड केलेली राहते. ईएमआय चे हप्ते वेळेवर भरलेले असतात. क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर केलेलं असतं. म्हणून अशा लोकांना लवकरच कर्ज मंजूर होत असत. मात्र जर क्रेडिट स्कोर हा कमी असेल अशा लोकांचा क्रेडिट हिस्ट्री ही चांगली नसते असा याचा अर्थ काढला जातो.
परिणामी बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र अनेकदा असेही होतं की सिबिल स्कोर चांगला राहूनही बँकांकडून कर्ज मिळत नाही. आज आपण असं नेमकं का होतं? क्रेडिट स्कोर चांगला राहून देखील कर्ज बँकेकडून का लवकर मिळत नाही? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अधिक वय असल्यास
तज्ञ लोकांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असेल पण त्यांचं वय हे अधिक असेल म्हणजेच 60 पेक्षा अधिक तर अशा लोकांना बँकांकडून कर्ज नाकारल जाऊ शकत. म्हणजे ज्या लोकांचे निवृत्तीचे वय जवळ असते अशा लोकांना गृह कर्जासाठी किंवा इतर 15 ते 25 वर्षे परतफेडच्या कर्जासाठी पात्र मानले जात नाहीत.
उत्पन्नाच्या स्रोतामुळे
कर्ज मंजूर करताना सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा घटक निश्चितच आहे मात्र या व्यतिरिक्त देखील अन्य घटकही कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाचे स्रोत देखील तपासले जातात. जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला असेल मात्र मासिक उत्पन्न त्याच कमी असेल तर अशा व्यक्तींना देखील कर्ज नाकारल जाऊ शकत.
ईएमआय आणि उत्पन्नाचे प्रमाण
कर्ज मंजूर करणाऱ्या संस्था क्रेडिट स्कोर पण पाहतात आणि ईएमआय अन मासिक उत्पन्नाचे प्रमाण देखील पाहतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न हे EMI पेक्षा 50% पेक्षा अधिक असेल तर अशा लोकांना कर्ज मंजूर होऊ शकतं. म्हणजे EMI रक्कम मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर नवीन कर्जासं मंजुरी मिळण्याची शक्यता वाढते.
जॉबमुळे पण कर्ज मिळत नाही
अनेक जण वारंवार नोकऱ्या बदलत असतात. अशा परिस्थितीत अशा लोकांचे करिअर अस्थिर समजले जाते. परिणामी या लोकांच्या कर्ज मंजुरीसाठी बँका धजावत नाहीत. यामुळे क्रेडिट स्कोर चांगला असला तरी देखील जॉबमध्ये जर स्थिरता नसेल तर कर्ज मंजूर होण्यास अडचणी येऊ शकतात हे मात्र नक्की.