CIBIL Score : प्रत्येकाला स्वप्नातील घर बांधण्यासाठी, खरेदीसाठी गृहकर्ज किंवा वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन किंवा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, टूव्हिलर, फोरव्हीलर वाहन यांसारख्या उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. अनेकांनी यासाठी कर्जही घेतलं असेल. ज्यांनी कर्ज घेतल असेल त्यांना सिबिल स्कोर बाबत चांगलीच माहिती असेल. ज्यांनी घेतलेले नसेल अशा व्यक्तींना आम्ही सांगू इच्छितो की, कर्ज घेण्यासाठी बँकांकडून नेहमीच सिबिल स्कोर तपासला जातो.
ज्यांचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा चांगला असतो त्यांना ताबडतोब कर्ज मंजूर केलं जातं. सिबिल स्कोर जर तुम्हाला ठाऊक नसेल तर आपण सिबिल डॉट कॉम (cibil.com) या संकेतस्थळावर जाऊन सिबिल स्कोर चेक करू शकणार आहात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान कॅल्क्युलेट केला जातो किंवा मोजला जातो.
ज्यांचा सिबिल स्कोर हा 700 च्या पुढे असतो त्यांचा क्रेडिट इतिहास म्हणजे कर्जाची पार्श्वभूमी चांगली असते. अशा लोकांना बँकांकडून सहजतेने कर्ज उपलब्ध होत असतं. निश्चितच कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर हा महत्त्वाचा घटक आहे मात्र याही व्यतिरिक्त कर्जांसाठी काही महत्त्वाचे घटक असतात. जसे की, उत्पन्नाचे स्रोत इत्यादी. दरम्यान आज आपण सिबिल स्कोर कसा सुधारायचा याविषयी जाणून घेणार आहोत.
सिबिल स्कोर खराब कां होतो?
सिबिल स्कोर कसा सुधारायचा हे जाणून घेण्याआधी आपण सिबिल स्कोर का खराब होतो या प्रश्नकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेकजण आमचा सिबिलच खराब आहे नेमका सिबिल का खराब होतो असा प्रश्न उपस्थित करतात.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिबिल खराब होण्याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी काही प्रमुख कारणे म्हणजेच बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड न करणे, यासोबतच क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे, एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाळगणे, अनेकदा बँक खात्यात अपेक्षित शिल्लक रक्कम संबंधितांकडून मेंटेन केली जात नाही याहीमुळे सिबिल स्कोर हा डाऊन होत असतो.
यामुळे सिबिल स्कोर डाउन होण्याची अनेक कारणे आहेत यापैकी तुम्ही जर कोणतीही चूक करत असाल तर तुमचा सिबिल डाऊन होऊ शकतो. त्यामुळे या चुका शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आता आपण खराब झालेला सिबिल कसा सुधारायचा याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
सिबिल स्कोर कसा सुधारायचा बरं?
आपण सिबिल स्कोर खराब होण्याची कारणे पाहिलीत आता खराब झालेल्या सिबिल स्कोर कशा पद्धतीने रिकव्हर केला जाऊ शकतो किंवा सुधारला जाऊ शकतो याविषयी जाणून घेऊया.
तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर गरजेपेक्षा अधिक पर्सनल लोन घेऊ नका.
घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची तसेच इतर कर्जाची विहित कालावधीमध्ये परतफेड करा.
कर्जाचे हप्ते अर्थातच ईएमआय थकणार नाहीत याची काळजी घ्या.
तुम्ही जर क्रेडिट कार्ड धारक असाल तर क्रेडिट कार्डचे हप्ते वेळोवेळी आणि विहित कालावधीमध्येच भरा.
यासोबतच क्रेडिट युटीलायझेशन रेशो कमी ठेवा, म्हणजे क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या 30% पेक्षा अधिक रक्कम वापरू नका.
अनेकदा क्रेडिट कार्डवर कर्ज काढलं जातं. मात्र असे केल्याने सिबिल लो होतो. यामुळे ही चूक टाळा.
तुमचे जुने क्रेडिट कार्ड असेल तर ते बंद करू नका. अनेकदा जुन्या क्रेडिट कार्डचा क्रेडिट हिस्ट्री देखील कामी येते. त्यामुळे सिबिल सुधारण्यास मदत होते.
तसेच कोणत्याही कर्जासाठी अर्ज करू नका, तुम्ही त्या कर्जासाठी पात्र असाल तरच अर्ज करा. म्हणजेच कर्जाच्या पात्रतेच्या अटी व शर्ती आधीच वाचून मग त्यासाठी अर्ज करणे तुमच्यासाठी उपयोगी राहील.
यासोबतच तुमचा क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल स्कोर वेळोवेळी तपासत रहा. यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब आहे की उत्तम आहे याची कल्पना तुम्हाला येईल. आणि खराब स्कोर असेल तर तुम्ही केलेल्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला मदत होईल.