Cibil Score Improvement Tricks : आपल्याला प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा कर्जाची गरज पडत असते. घर बांधण्यासाठी, नवीन वाहन खरेदी करण्यासाठी, लॅपटॉप किंवा इतर तत्सम महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा मग वैयक्तिक खर्चासाठी केव्हा ना केव्हा आपण कर्ज घेण्याचा विचार करतो किंवा कर्ज हे घेत असतो.
जर तुम्ही यापूर्वी कधी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला सिबिल माहितीच असेल. तसेच जर तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सिबिल बद्दल अवश्य सांगितलं गेलं असेल. वास्तविक हा सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी एक अति महत्त्वाचा घटक आहे. हा स्कोर 300 ते 900 दरम्यान गणला जातो.
जर हा स्कोअर कमी राहिला तर कर्ज घेण्यास अडचणी येतात. मात्र जर स्कोर चांगला असला तर कर्ज तत्काळ मंजूर होतं शिवाय अधिक कर्ज मिळतं आणि व्याजदर देखील कमी राहतो. परंतु असे असले तरी अनेक लोकांचे सिबिल स्कोर कोरोना काळापासून बिघडले आहेत. यामुळे अशा लोकांना कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; धानाच्या ‘या’ नवीन जाती ठरतील फायदेशीर, मिळणार अधिक उत्पादन
आता ही मंडळी मात्र आपला सिबिल स्कोर सुधारू पाहत आहे. परंतु हा स्कोर कशा पद्धतीने सुधारला जाऊ शकतो याची माहिती या मंडळीला नाही. म्हणूनच आज आपण सिबिल स्कोर सुधारण्याच्या तीन ट्रिक जाणून घेणार आहोत. वास्तविक या ट्रिक नसून सिबिल सुधारण्याची एक रीतसर पद्धत आहे. या पद्धतीत सिबिल स्कोर सुधारण्यासाठी थोडा काळ लागू शकतो मात्र हमखास सिबिल स्कोर सुधारतो असा तज्ञांचा दावा आहे. सर्वप्रथम आपण सिबिल स्कोर खराब का झाला किंवा का होतो याबाबत जाणून घेऊया.
सिबिल स्कोर खराब होण्याची काही कारणे थोडक्यात
जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून किंवा कोणत्याही इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल मग ते कर्ज कोणतेही असो जसे की होम लोन, पर्सनल लोन, वेहिकल लोन इत्यादी. या लोनची किंवा कर्जाची परतफेड जर संबंधित व्यक्तीने व्यवस्थित केली नाही तर सिबिल स्कोर खराब होतो. म्हणजे कर्जाचा हप्ता चुकवला की हमखास सिबिल स्कोर डाउन होत असतो.
हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज रात्रीपासून ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार ‘इतके’ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणता? पहा….
यासोबतच जे क्रेडिट कार्ड धारक असतात त्यांनी जर आपली क्रेडिट कार्ड चे बिले वेळेवर परतफेड केली नाही तर अशा लोकांचा सिबिल खराब होऊ शकतो. एवढेच नाही तर अनेक लोक आपल्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम ठेवत नाहीत. जे की चुकीचे असून यामुळे संबंधित व्यक्तीच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यामुळे खात्यात बँकेने निर्धारित केलेली पुरेशी किमान रक्कम कायम असणे अनिवार्य आहे.
जर आपण खात्यात पुरेशी रक्कम ठेवली नाही म्हणजेच मिनिमम बॅलेन्स मेंटेन केला नाही तर आपणास बँकेकडून फाईनही बसतो आणि आपला सिबिल देखील यामुळे खराब होत असतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असला की चांगला असल्याचे समजले जाते. यामुळे सिबिल स्कोर हा नेहमी 700 पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
सिबिल स्कोर कसा सुधारायचा?
सिबिल स्कोर हा जर कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्यामुळे किंवा इतर अन्य कारणांमुळे खराब झाला असेल तर तो लगेचच एक दिवसात किंवा दोन दिवसात सुधारला जाऊ शकत नाही. यासाठी एक प्रोसेस असते त्या प्रोसेस ला फॉलो करावे लागेल. तज्ञ लोक सांगतात की खराब झालेला सिबिल आज जवळपास दोन वर्षापर्यंत नकारात्मक राहतो. मात्र, यानंतर जर कर्जदार व्यक्तीने कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर दिले तर सिबिल सुधारण्यास सुरुवात होते. चला तर मग जाणून घेऊया सिबिल सुधारण्याच्या तीन पद्धती.
सिबिल स्कोर सुधारण्याची पहिली पद्धत म्हणजे घेतलेले कर्ज वेळेवर आणि न चुकता भरणे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमचा कर्जाचा हप्ता चुकला आणि तुम्ही लगेचच दोन किंवा तीन दिवसात तो कर्जाचा हप्ता भरला, त्याची पेनल्टी देखील भरली तरीही ही गोष्ट सिबिल साठी चांगली नसते. म्हणजेच सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी वेळेवर, ज्या दिवशी तुमचा कर्जाचा हप्ता आहे त्याच दिवशी तो हप्ता भरणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :- पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने…
यासोबतच जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर क्रेडिट कार्डची लिमिट ही 30% पेक्षा कमीच खर्च करा. क्रेडिट कार्डची लिमिट अधिक वापरली तर वित्तीय संस्थांना तुमच्या उत्पन्नावर शँका उत्पन्न होते, परिणामी सिबिल वर परिणाम होण्याची शक्यता असते. यासोबतच क्रेडिट कार्डचे बिले वेळेवर भरा उशीर झाल्यास सिबिल डाऊन होतोच.
यासोबतच अनेकदा बँकिंग कामांमध्ये झालेल्या चुकीने देखील सिबिल खराब होतो. जसे की कर्ज फेडल्यानंतर एनओसी न घेणे हे देखील सिबिल डाउन करण्यासाठी कारणीभूत ठरते. यासोबतच कोणत्याही कर्जासाठी अप्लाय करण्यापूर्वी त्या कर्जाची सर्व माहिती अवश्य कलेक्ट करा. तसेच कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे सादर करा. कागदपत्रे अपूर्ण देऊ नका. कर्जासाठी पात्र असाल तरच कर्ज घ्या. सर्वात महत्त्वाचं घेतलेले कर्ज नियमितपणे आणि योग्य पद्धतीने फेडा. यासोबतच नेहमी आपल्या बँक खात्यात मिनिमम अकाऊंट बॅलन्स मेंटेन करा. खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिलवर होतो.
वर नमूद करण्यात आलेल्या या काही बाबींची तुम्ही तर काळजी घेतली तर खराब झालेला सिबिल देखील सुधारू शकतो. यासाठी मात्र अवकाश लागेल, लगेचच सिबिल सुधारत नाही यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र जर तुम्ही वारंवार कर्जासंबंधी अशा काही चुका करत असाल तर तुमचा सिबिल कधीच सुधारणार नाही. यामुळे या छोट्या-छोट्या चुका टाळून तुम्ही तुमचा सिबिल निश्चितच सुधारू शकणार आहात.