स्पेशल

Cibil Score : बातमी कामाची ! सिबिल स्कोर ‘या’ ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटात चेक करा; शुल्कही लागणार नाही, पहा…..

Cibil Score : सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर बँकिंग कामांमध्ये विशेषता कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सिबिल स्कोर हा 300 ते 900 यादरम्यान मोजला जातो. एवढा अधिक स्कोर तेवढेच कर्ज मिळवण्याचे चान्सेस अधिक असे याचे समीकरण आहे. असं सांगितलं जातं की ज्या लोकांचा सिबिल हा 750 पेक्षा अधिक आहे अशा लोकांना सहजतेने बँका कर्ज देतात.

निश्चितच, कर्ज घेण्यासाठी तसेच एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे घेतलेल्या कर्ज हस्तांतरित करण्यासाठी सिबिल स्कोर अति आवश्यक असतो.

होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन यांसारखे इत्यादी लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर खूपच महत्त्वाचा घटक असतो. मात्र अनेकांना आपला सिबिल स्कोर कसा चेक करायचा याबाबत माहिती नसते.

परिणामी आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी ऑनलाइन पद्धतीने सिबिल स्कोर कसा चेक करायचा याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे आज आपण विनाशुल्क सिबिल स्कोर चेक करण्याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सिबिल स्कोर ऑनलाइन चेक करण्याची प्रोसेस 

निशुल्क सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला cibil.com या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला get your free CIBIL score and report या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या पुढ्यात एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे. ईमेल पत्ता, पासवर्ड तयार करा, नाव, फोन नंबर आणि आयडी नंबर इ. हा आयडी क्रमांक तुमचा पॅन, पासपोर्ट, मतदार आयडी, ड्रायव्हरचा परवाना किंवा रेशन कार्ड क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल.

ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर accept and continue या बटनावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सबस्क्रीप्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाईल. जर तुम्हाला सबस्क्रीप्शन घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. पण जर तुम्हाला हा प्लॅन आवश्यक नसेल तर आपण नो थँक्स या पर्यावर क्लिक करू शकता.

यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावर क्लिक करावयाचे आहे. यानंतर you have successfully enrolled असा दिसेल. या ठिकाणी गो टू डॅशबोर्ड यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर मिळून जाईल. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts