स्पेशल

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….

Cidco House News : मुंबई तसेच राज्यातील इतर महानगरात सदनिकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे सामान्य लोक आपल्या स्वप्नातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच म्हाडा आणि सिरकोने तयार केलेल्या घरांची वाट पाहत असतात.

दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच 4 हजार 83 सदनिकांसाठी सोडत जारी केली आहे. यासाठी 22 मे 2023 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशातच आता सिडकोच्या माध्यमातून मुंबईत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

अत्यल्प, मध्य आणि उच्च उत्पन्न गटासाठी सिडको लवकरच घर सोडत जारी करणार आहे.

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यानंतर वेगवेगळ्या उत्पन्न गटातील सदनिकांची लॉटरी सिडको जारी करणार आहे.

या लॉटरीच्या माध्यमातून सिडको कडून तब्बल 65 हजार सदनिका सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोकडून काढल्या जाणाऱ्या या लॉटरीसाठी नवीन सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ महिन्याच्या पगारसोबत मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

कोणत्या भागातील सदनीकांसाठी निघणार लॉटरी

हाती आलेल्या माहितीनुसार जून महिन्यात सिडको कडून तळोजा येथील 5000 घरांसाठी ची सोडत काढली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की तळोजा परिसरातील ही घरी शिर्के कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे.

यानंतर सिडको खारकोपर, कळंबोली, खारघर, जुईनगर आणि सानपाड्यातील घरांसाठी लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे या भागातील घरांची कामे अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील आणि या घरांची लॉटरी काढली जाईल असं सांगितलं जात आहे.

वास्तविक, भाजप सेना युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको कडून एक लाख घरांची निर्मिती होईल अशी घोषणा केली होती.

हे पण वाचा :- म्हाडा मुंबई लॉटरी : 50 हजार पगार असलेल्या लोकांनाही Mhada चे अत्यल्प गटातील घर दुरून डोंगर साजरेच, आता पर्याय काय? घरासाठी किती कर्ज मिळू शकत? पहा….

फडणवीस यांनी एका वर्षाच्या काळात एक लाख सदनिकांची निर्मितीचे टार्गेट ठेवले होते. मात्र, सिडको कडून वेळेत या सदनिकांची निर्मिती झालेली नाही. परंतु आता लवकरच याला मूर्त रूप मिळणार आहे.

दरम्यान सिडकोकडून नुकतीच तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली आणि घणसोलीमध्ये सात हजार ४४९ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी भाग्यवान विजेत्यांना घरांच्या वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

सोबतच सिडकोतर्फे तळोजा, कळंबोली, खारकोपर, उलवे, जुईनगर, सानपाडा आदी भागांत घरांची कामे केली जात असून ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे या भागात तब्बल ६५ हजारांपेक्षा जास्त घरे आगामी काही महिन्यात सर्वसामान्यांसाठी सिडको कडून उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय ! जमीन NA करण्यासाठी आता महसूल विभागाकडे जाण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीने जमिनी होणार NA, वाचा याविषयी सविस्तर

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts