स्पेशल

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….

Cidco Lottery 2023 : गेल्या काही दशकात वाढती महागाई आणि घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या रॉ मटेरियलच्या किमतीत झालेली वाढ यामुळे घरांच्या किमती आधीच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत. विशेषतः मुंबई, नासिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

यामागे महागाई, इंधन दरवाढ, बिल्डींग मटेरियल मध्ये झालेली दरवाढ, जागेची कमतरता, वाढती लोकसंख्या यांसारखे एक ना अनेक कारणे प्रमुख आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना या महानगरात घरे घेणे म्हणजेच अवघड बाब बनली आहे.

म्हणून सर्वसामान्य मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये म्हाडा आणि सिडकोने उपलब्ध करून दिलेल्या परवडणाऱ्या दरातील घरांना कायमच पसंती दाखवतात. 

हे पण वाचा :- दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

दरम्यान, नवी मुंबई मध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सिडकोच्या माध्यमातून लवकरच 5000 घरांसाठीची लॉटरी जारी केली जाणार आहे. खरंतर, सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठी म्हाडाच्या अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता डिग्गीकर यांच्याकडून या घर सोडतिला हिरवा कंदील मिळाला की सिडकोच्या 5000 सदनिकांसाठी जाहिरात काढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता या पाच हजार सदनिकांसाठी गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी जाहिरात निघणार होती.

मात्र त्यावेळी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची बदली करण्यात आली. आता सिडको व्यवस्थापकीय संचालक पदावर अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती झाली असून ते लवकरच या नवीन घर सोडतिला हिरवा कंदील दाखवतील असा आशावाद व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा :- कौतुकास्पद! सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना कर्मचारी अशी करणार मदत, वाचा…

यामुळे नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्या लोकांना सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून येणार असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीमध्ये तळोजा नोड येथील घरांचा समावेश राहणार आहे. तसेच ही लॉटरी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत काढली जाणार आहे.

अर्थातच सर्वच्या-सर्व घरे ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेत समाविष्ट केले जातील. तसेच या लॉटरीमध्ये एकाच टप्प्यात घरे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली या परिसराच्या सिडकोच्या प्रकल्पातील घरांचे कामे देखील युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत.

या घरांची कामे पूर्ण झाल्यानंतर ही देखील घरे आगामी लॉटरीत समावेश करण्यात येणार आहेत. अर्थातच तुम्ही जर नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपणास आतापासूनच यासाठी पैशांची जमवाजमव सुरू करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts