Cotton Farming In Maharashtra : कापूस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाचे चित्र. या तीन विभागात सर्वाधिक कापसाचे उत्पादन आपल्याकडे होते. दरम्यान मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो आणि येथील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
शिवाय गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाण्याची उपलब्धता अलीकडे अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. जालना प्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात कापसाची शेती वधारू लागली आहे. अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही कापूस लागवड पाहायला मिळते.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा
वास्तविक कापसाची शेती ही खरीप हंगामात होते आणि डिसेंबर अखेर शेत हे मोकळ होत असतं. पण अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकातून अधिकची कमाई करण्यासाठी फरदड कापूस उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात शेतकऱ्यांनी अजूनही कपाशी काढलेली नाही ते आता फरदड उत्पादन घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते कापूस काढणी करून नव्याने नवीन पीक लावण्यासाठी पूर्व मशागत, बियाण्याचा खर्च, खतांचा अधिकचा खर्च करण्यापेक्षा ते फरदड कापूस उत्पादन घेतात. पण आता दोन पैसे अधिक कमवण्याच्या नादात शेतकरी बांधव पुढील हंगामात मोठ संकट उभ करून घेत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केल आहे.
हे पण वाचा :- राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क अन अधिकारीची पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच भरली जाणार?
कृषी विभागाने शेतकऱ्यांना फरदड कापूस उत्पादन टाळण्याचा सल्ला यावेळी दिला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जर कापूस उत्पादकांनी फरदड उत्पादन घेतले तर पुढील हंगामात बोंड अळीच संकट अधिक गडद होणार आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड उत्पादन घेऊ नये आता कापाशी पिक काढून जमिनीची चांगली नागरणी करून घ्यावी. नांगरणी केल्याने उन्हाळ्यात जमिनीची चांगली धूप होते. यामुळे जमिनीमध्ये असलेले हानिकारक कीटक मरण पावतात. शिवाय जमिनीत दाबले गेलेले कीटक वर येतात आणि पक्षी हे कीटक भक्ष्य करतात.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम; एमएमआरडीएने थेट तारीखच सांगितली
यामुळे शेतकऱ्यांनी लागलीच नांगरणी करणे अनिवार्य आहे. दरम्यान सध्या कापसाला शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कापसाला 12 ते 13 हजाराचा दर मिळाला होता. पण या हंगामात फक्त साडेसात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळत आहे.
काही ठिकाणी भाव पातळी 9 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पहावयास मिळत आहे. पण शेतकऱ्यांना किमान दहा हजाराचा दर मिळण्याची आशा होती. तूर्तास मात्र कापूस दर दबावात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.