स्पेशल

Cotton Farming : कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

Cotton Farming : कापसाला शेतकरी पांढरे सोने म्हणून ओळखतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याप्रमाणेच कापसाला बाजारात मोठी मागणी असते आणि नेहमी चांगला दर मिळतो. गेल्या हंगामात मात्र कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. पण तरीही यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात फारशी घट होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कापूस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. जर तुम्हीही कापूस लागवड केली असेल किंवा लागवड करण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. खरंतर आपल्या राज्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होते.

राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कापूस या पिकावर अवलंबित्व आहे. पण कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

अशा परिस्थितीत या आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञ लोकांनी शेतकऱ्यांना या हंगामात कापूस लागवड करताना काही बाबींची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आज आपण हा सल्ला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…

कापूस लागवड करतांना ही काळजी घ्या

तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस लागवड कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन पद्धतीमध्ये होते. यात बागायती कापूस लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केली जाते. यंदा मात्र पाणी पातळी मध्ये घट झाली आहे तसेच तापमान देखील अधिक आहे परिणामी बागायती कापसाची लागवड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, बागायती कापूस लागवड करताना जमिनीची खोल नागरणी करणे जरुरीचे आहे.

कोरडवाहू कापूस लागवड करताना शेतकऱ्यांनी किमान 50 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला तेव्हाच लागवड करावी असा सल्ला देण्यात आला आहे. मान्सूनचा एक पाऊस पडला की लगेच कापूस लागवडीला सुरवात करू नये. समाधानकारक म्हणजेच किमान 50 मिली पेक्षा अधिक पाऊस झाला तेव्हाच कोरडवाहू भागात कापसाची लागवड केली पाहिजे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…

बोंडआळी नियंत्रणासाठी ही काळजी घ्या

कापूस लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नागरणी केली पाहिजे. यामुळे जमिनीत असलेले अळ्यांचे कोष नष्ट होतात.

यंदा राज्यातील बहुतांशी भागात विशेषता कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान खूप अधिक आहे. यामुळे बागायती कापूस लागवड ही मे महिन्याच्या शेवटी करण्याऐवजी जून महिन्याच्या सुरुवातीला केली पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे.

यंदा पाण्याची पातळी देखील खूपच खालावली आहे यामुळे बागायती कापूस लागवड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच करावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

तसेच बोंड आळी कापूस पिकावर येऊ नये यासाठी गेल्या हंगामात ज्या जमिनीवर कापूस लागवड करण्यात आली असेल त्या जमिनीवर यंदा कापसाची लागवड करू नये. म्हणजे पिकाची फेरपालट करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाच्या लवकर परिपक्व होणाऱ्या वाणाची लागवड केली पाहिजे. यामुळे बोंड आळी देखील पिकावर येणार नाही.

कापसाचे अधिकृत बियाणे वापरावे आणि त्यासोबत दिलेले नॉन बीटी बियाण्याची बांधाच्या कडेला लागवड करावी.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच गावातील किंवा परिसरातील कापूस उत्पादकांनी एकाच दिवशी कापूस लागवडीला प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे सर्व कापूस उत्पादकांचा कापूस एकाच वेळी काढण्यासाठी येईल यामुळे बोंड आळीला पोषक हवामान मिळणार नाही. 

हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts