Cotton Rate : दरवर्षी विजयादशमीपासून अर्थातच दसऱ्यापासून कापसाची आवक वाढत असते. यंदाही विजयादशमी झाल्यापासून कापसाची आवक वाढत आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी दाखल होत असून आज अर्थातच 21 ऑक्टोबर 2024 ला ही राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाची चांगली आवक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. शेतकऱ्यांना कापसाला किमान दहा हजाराचा भाव मिळाला हवा अशी आशा आहे. मात्र सध्या कापसाचे भाव सात हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील प्रमुख प्रकारांमध्ये सध्या कापसाला काय दर मिळतोय? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कापसाला काय दर मिळतोय?
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळानुसार आज सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 क्विंटल कापसाची आवक झाली होती. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला किमान, कमाल आणि सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान सहा हजार तीनशे, कमाल 6,500 आणि सरासरी 6425 असा दर मिळाला आहे. खानदेशातील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाला किमान 6 हजार 110, कमाल 6875 आणि सरासरी 6 हजार 450 असा भाव मिळाला.
याशिवाय खानदेशातील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मेडीयम स्टेपल अर्थातच मध्यम धाग्याच्या कापसाला किमान 6120 कमाल 6,640 आणि सरासरी 6450 असा दर मिळाला आहे. सध्याचा बाजार भाव हा शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. कापसाला किमान दहा हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
यामुळे आगामी काळात कापसाला काय दर मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सध्या राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाची आवक होत आहे. पण, अजूनही कापसाची आवक कमीच आहे. तथापि आगामी काळात कापसाची आवक वाढणार आहे.
यंदा कापसाचे उत्पादन समाधानकारक राहणार असा अंदाज वर्तवला जात होता मात्र सध्या सुरू असणाऱ्या मान्सूनोत्तर पावसाचा कापूस पिकाला फटका बसत असून यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती आता व्यक्त होऊ लागले आहे. यामुळे जर आगामी काळात कापसाचे भाव वाढले तरच कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार आहे नाहीतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे बोलले जात आहे.