Cow Farming : शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांना भारतातील काही लोक फारच छोटा व्यवसाय समजतात. शेतीचा व्यवसाय म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी ची धडपड असा अनेकांचा समज आहे. पण हा व्यवसाय फक्त पोट भरण्यासाठी नाही तर आपल्या समवेत इतरांचे पोट भरून चांगली कमाई करण्याचा व्यवसाय आहे.
भारतात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होतो. शेतकरी बांधव वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांचे संगोपन करतात. गाय, म्हैस, घोडा, बकरी, मेंढी, डुक्कर अशा विविध प्राण्यांचे संगोपन केले जाते.
दरम्यान जर तुम्हीही गाय पालन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते.
भारतीय समाजात अनेकदा शेती आणि पशुपालनाला कमी लेखले जाते, पण याउलट हा समज मोडून काढत सुलतानपूर येथील संतोष सिंग हे गेल्या अनेक वर्षांपासून दूधाचा धंदा करत आहेत. संतोष सिंग यांनी गाय पालन व्यवसायातून आतापर्यंत लाखों रुपयांची कमाई केली आहे. दुग्धोत्पादनासाठी त्यांनी अनेक जातींच्या गायी पाळल्या आहेत.
यामध्ये गीर, साहिवाल, होल्स्टीन फ्रिजियन आणि जर्सी जातीच्या गायींचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की या चार प्रजातींपैकी फ्रिजियन गाय सर्वाधिक दूध देते. संतोषकडे एकूण 20 हून अधिक गायी आहेत. संतोष सुलतानपूरच्या चौकिया ग्रामसभेचे रहिवासी आहेत.
संतोष गेल्या २५ वर्षांपासून गायींचे संगोपन करून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन मिळवत आहेत. त्यांनी पाळलेल्या 20 हून अधिक गायींपासून ते दररोज 100 लिटरहून अधिक दूध मिळवतात आणि ते डेअरीमध्ये विकतात.
यामुळे तो दररोज 3000 रुपयांहून अधिक तर दर महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे. महत्त्वाचे म्हणजे संतोष उच्चशिक्षित आहेत. त्यांनी रशिया मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
विदेशातून शिक्षण पूर्ण केलेले असतानाही त्यांनी गावी येऊन आपला हा व्यवसाय थाटला आहे. संतोष आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग गायपालन व्यवसायात करत असून यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन मिळते.
नक्कीच जर तुम्हालाही गाय पालनाचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही संतोष यांनी ज्या गाईंचे पालन करून चांगले दूध उत्पादन मिळवले आहे त्या जातीच्या गाईंचे पालन करून गाय पालनाचा व्यवसाय सुरू करू शकता.