DA Hike:- सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विषय म्हणजे महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व वेतन आयोग होय. जर आपण महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सातव्या वेतन आयोगानुसार तो वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो. परंतु 2023 या वर्षाचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात फक्त एकदाच म्हणजे मार्च महिन्यामध्ये वाढ करण्यात आली होती व ती साधारणपणे चार टक्क्यांनी करण्यात आली होती. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून त्याच्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
लाखो कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा
सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्त्याचा विचार केला तर तो साधारणपणे 42 टक्के इतका मिळत आहे. केंद्र सरकारकडून पुन्हा त्यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून सध्या मिळणाऱ्या 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महागाई भत्ता हा सातवा वेतन आयोगानुसार दिला जातो व त्यामध्ये वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते.
जर आपण 2023 चा विचार केला तर या वर्षी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मार्च महिन्यामध्ये वाढवण्यात आला होता व तो चार टक्के वाढीसह 42 टक्के इतका झाला. तसे पाहायला गेले तर दरवर्षी दर सहा महिन्यांनी यामध्ये वाढ करण्यात येते. जर एका वर्षातील वाढीचा विचार केला तर साधारणपणे वाढ ही जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये केली जाते. परंतु यावर्षी यामध्ये थोडा बदल करण्यात आला व मार्च महिन्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.
त्यामुळे पुढील वाढ ही ऑगस्ट महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुसरी महत्त्वाचे भेट म्हणजे महागाई भत्ता सोबतच त्यांच्या डीआर मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए 46% होईल व त्यानुसार विचार केला तर कर्मचाऱ्यांचा पगार हा वार्षिक 8000 ते 27 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
घरभाडे भत्त्यात देखील होऊ शकते वाढ
महागाई भत्ता वाढीसोबत कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तावाढ देखील केली जाण्याची शक्यता आहे. जर आपण घरभाडे भत्त्यातील वाढ पाहिली तर ती साधारणपणे जुलै 2021 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये 3% ची वाढ अपेक्षित आहे. जर सरकारने महागाई भत्ता वाढीसोबत घरभाडे भत्त्यात वाढ केली तर याचा फायदा देशातील 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार हे मात्र निश्चित.