DA Hike Update:- सध्या दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण काही दिवसात येऊन ठेपले असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक फायद्याच्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यातल्या त्यात देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून व येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत व त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार हे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक, शेतकरी व इतर घटकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खुश करण्याच्या उद्देशाने अशा घोषणा केल्या जाऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या अनुषंगाने जर आपण केंद्र कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या अनुषंगाने विचार केला तर त्यांना महागाई भत्ता वाढीच्या स्वरूपामध्ये वेतनात आणि पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांची दिवाळी गोड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळीपर्यंत महागाई भत्तावाढीची होईल घोषणा?
महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना कित्येक दिवसापासून असून ही प्रतीक्षा दसऱ्यापर्यंत संपेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ताजा रिपोर्टचा विचार केला तर, दिवाळीलाच केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीविषयी घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे.
महागाई भत्त्यात यावेळी चार टक्क्यांची वाढ मिळण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर सध्या कर्मचाऱ्यांना जो काही 42% इतका महागाई भत्ता मिळत आहे तो या चार टक्के वाढीसह 46% होईल. महागाईभत्यात वाढ झाल्याबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होईल. परंतु अद्यापपर्यंत मात्र सरकारकडून यासंबंधीची कोणतीही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आपल्याला माहित आहेस की कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता दिला जातो तो वर्षातून दोनदा दिला जातो. त्याचा लाभ हा जानेवारी आणि जुलैपासून दिला जातो. आपण 2023 या वर्षीचा विचार केला तर 24 मार्च 2023 रोजी सरकारने या वर्षातल्या पहिल्या महागाई भत्ता वाढीची घोषणा केली होती.
या महागाई भत्ता वाढीचा लाभ हा कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना एक जानेवारी 2023 पासून दिला जात आहे. तेव्हा तो अडतीस टक्के होता व 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला होता. यानुसार जर आता दिवाळीला सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली तर त्याचा लाभ हा कर्मचाऱ्यांना एक जुलै 2023 पासून मिळेल.
कर्मचाऱ्यांची पगार आणि महागाई भत्ता यांचा आहे अशा पद्धतीने परस्परसंबंध
समजा केंद्र सरकारने जर चार ऐवजी तीन टक्क्यांची वाढ महागाई भत्त्यात केली तर 18 हजार रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 7560 रुपयांवरून आठ हजार शंभर रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 540 रुपयांची वाढ होईल.
समजा महागाई भत्त्यात जर चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 8280 रुपये होईल व पगारामध्ये 690 रुपयांची वाढ होईल. तसेच कमाल बेसिक पे च्या आधारे आकडेवारी पाहिली तर 56 हजार 900 रुपयांवर तीन टक्क्यांची वाढ म्हणजेच 45 टक्के महागाई भत्तावाढ झाली तर तेवीस हजार 898 रुपयांवरून तो 25 हजार 605 रुपये होईल वर्षे 46 टक्क्यांची वाढ झाली तर तो 27 हजार 554 रुपये इतका होईल.