DA Hike Update:- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत असून राज्यातील नागरिकांना खुश करण्याच्या उद्देशाने आपण पाहिले की अर्थसंकल्पामध्ये देखील अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या व अगदी त्याच प्रकारे आता सरकारी कर्मचाऱ्यांना देखील खुश करता यावे
याच प्रयत्नांचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकांच्या अगोदरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. अगोदर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता व तो आता या चार टक्के वाढीसह 50% पर्यंत पोहोचला आहे व त्याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे.
राज्य सरकारची कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली असून आता कर्मचाऱ्यांना 46 टक्क्यांऐवजी 50% पर्यंत महागाई भत्ता मिळणार आहे.
तसे पाहायला गेले तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्यात वाढ केली जावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसापासून होती. अशा प्रकारची वाढ करावी यासंबंधीचा प्रस्ताव देखील सरकारच्या विचाराधीन होता व त्यानुसार जाता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
महागाई भत्त्याचा हा सुधारित दर सातव्या वेतन आयोगानुसार ठरवण्यात आला आहे व त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळवणारा महागाई भत्ता 50% झाला आहे.
कधीपासून लागू होईल ही वाढ?
सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली महागाई भत्त्यातील वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू होईल. इतकेच नाही तर एक जानेवारीपासून जून पर्यंत असलेली जी काही थकबाकी असेल ती जुलै महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे व महत्वाचे म्हणजे सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना या वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना या कालावधीतील मिळेल थकबाकी
ही महागाई भत्ता वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे व त्यामुळे आता एक जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असा देखील उल्लेख शासन आदेशात करण्यात आलेला आहे.