Marathi News : अनुवांशिकरीत्या संशोधित डुकराकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा जवळपास दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आणित्याच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने ही माहिती दिली असून रिचर्ड रिक स्लेमन (६२) असे मृत्यू झालेल्या
या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. त्यांच्यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यावेळी किडनी किमान दोन वर्षे ठीक राहावी, अशी आपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली .
डुकराची किडनी प्रत्यारोपण करणारे रिचर्ड रिक स्लेमन यांच्या मृत्यूनंतर, किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावरील शस्त्रक्रियेविषयी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले असून स्लेमनच्या निधनामुळे या डॉक्टरांच्या टीमने दु:ख व्यक्त केले आहे, मात्र स्लेमन यांचा मृत्यू प्रत्यारोपणामुळेच झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचेही डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
रिचर्ड हे दीर्घकाळापासून मधुमेहाने त्रस्त होते, त्यामुळे त्यांची किडनी खराब झाली होती. सुमारे सात वर्षे डायलिसिसवर राहिल्यानंतर, २०१८ मध्ये मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचे मानवी मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले, परंतु ते ५ वर्षातच अपयशी ठरले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
रिचर्ड यांना ज्या डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले, ते केंब्रिज, मॅसॅच्युसेट्सच्या युजेनेसिस सेंटरमध्ये विकसित केले गेले. डॉक्टरांनी डुकरातून मानवाला धोका निर्माण वा या टाकल्यानंतर त्यात काही मानवी जीन्सही जोडले होते, त्यामुळे त्याची क्षमता वाढली होती.
तसेच इजेनेसिस कंपनीने मानवी आरोग्यास संसर्ग करणारे डुकरांचे घातक विषाणूदेखील निष्क्रिय केले होते, तरीही अशी घटना का घडली असावी, याचे उत्तर शोधण्यासाठी या प्रयोगात आता डॉक्टरांचे पथकही प्रयत्न करीत आहे .