Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. जगातील सर्वाधिक लांबीचा दिल्ली मुंबई तृती महामार्गाचा पहिला टप्पा हा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यामुळे संपूर्ण भारतवासीयांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहणार आहे. वास्तविक हा महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा सिद्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्र सहित सहा राज्यांचा डायरेक्ट फायदा होणार असून अप्रत्यक्षरीत्या त्यामुळे संपूर्ण देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच हरियाणातील सोहना ते राजस्थान मधील दौसा उद्या म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करणार आहेत. हा टप्पा 229 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा महामार्गाचा पहिला टप्पा असून संपूर्ण महामार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबईच अंतर कमी होणार आहे. सध्या स्थितीला राजधानी मुंबईहून राजधानी दिल्ली दरम्यान प्रवास करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागत आहे.
मात्र या महामार्गामुळे हे अंतर फक्त 12 तासात पार होणार आहे. निश्चितच या महामार्गामुळे दिल्ली दूर नही है जनाब असं म्हणावं लागणार आहे. तूर्तास या महामार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार असून लवकरच संपूर्ण महामार्ग बांधण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आखण्यात आल आहे. हा महामार्ग जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. एवढेच नाही तर या मार्गावर अशा काही जागतिक दर्जाच्या सुविधा राहणार आहेत ज्यामुळे भारतीय महामार्ग देखील पाश्चात्य देशांच्या महामार्गाशी तुलना करण्यास सक्षम बनणार आहेत.
या संपूर्ण महामार्गावर एकूण 94 ठिकाणी वाहनचालकांना वेगवेगळ्या अशा अत्याआवश्यक सुविधा मिळणार आहेत. प्रत्येक 50 किलोमीटरवर रेस्ट एरिया उभारले जाणार आहेत. मार्गालगत राहणारे हे रेस्ट एरिया किंवा विश्राम क्षेत्र सुविधा पूर्ण राहणार असून यामध्ये रेस्टॉरंट, वस्तीगृह, रुग्णालय, फूड कोर्ट, इंधन केंद्र यांसारख्या सुविधांचा समावेश राहणार आहे.
व्यावसायिक वाहनांसाठी गॅरेज, पार्किंग, लॉजिस्टिक सुविधा राहणार आहेत. महामार्गावर दोन हजाराहून अधिक ठिकाणी जल रिचार्ज पॉईंट्स आणि दर पाचशे मीटर अंतरावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुविधा तयार केलेल्या राहतील. या महामार्गाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.