Delhi Mumbai Expressway : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता, महामार्ग देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. निश्चितच यामुळे हिंदुस्थानाच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. वास्तविक देशात या चालू वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाचणार आहे, तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूकां देखील राहणार आहेत.
अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले वेगवेगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली जात आहे. अशा परिस्थिती दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेचे काम देखील वेगात पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. भारताच्या एकात्मिक विकासासाठी महत्वाच्या अशा या देशातील सर्वात लांब महामार्गाबाबत आता एक मोठी माहिती देखील समोर आली आहे.
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाचा सोहना ते दौसा हा टप्पा पूर्ण झाला असून 12 फेब्रुवारी रोजी या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे लोकार्पण होणार आहे. निश्चितच देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई यांना जोडणारा हा नेत्रदीपक महामार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आज आपण या महामार्गात नेमक्या कोणकोणत्या विशेषता आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणून मिरवणार
राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा महामार्ग जगातील सर्वात लांब महामार्ग असण्याचा बहुमान मिळवणार आहे. याची लांबी 1390 किलोमीटर असणार आहे. हा महामार्ग जर्मन तंत्रज्ञानाने बांधला जात असून पुढील पन्नास वर्षे या महामार्गाची झीज होणार नसल्याचा दावा देखील ठोकण्यात आला आहे. या महामार्गाची एक मोठी विशेषता अशी की या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन देखील राहणार आहेत. सध्या स्थितीला हा महामार्ग आठ पदरी आहे मात्र भविष्यात याला बारापतदरी बनवता येणे शक्य राहणार आहे. या महामार्गावर 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने भरधाव धावणार आहेत. विशेष म्हणजे दिल्ली ते मुंबई सध्या स्थितीला 24 तासात पार करता येते परंतु या मार्गानंतर हे अंतर बारा तासातच गाठता येणे शक्य होणार आहे. याच्या खर्चाबाबत जर बोलायचं झालं तर 1.1 लाख कोटी रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. दरम्यान हा महामार्ग महाराष्ट्र व्यतिरिक्त अजून पाच राज्यांसाठी महत्त्वाचा राहणार आहे. दिल्ली हरियाणा राजस्थान मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यातून हा हा मार्ग जाणार असल्याने या 6 राज्यात एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या महामार्गामुळे या सहा राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरे परस्परांना बायरोड जोडली जाणार आहेत. परिणामी कृषी क्षेत्र, उद्योग जगत आणि पर्यटन क्षेत्र यामुळे लाभान्वित होणार आहे. दरम्यान आता या महामार्गाचा सोहना ते दौसा हा पहिला टप्पा 12 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वास्तविक पाहता हा टप्पा डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य होऊ शकले नाही. नितीन गडकरी यांनी जानेवारीअखेर या महामार्गाचा हा पहिला टप्पा प्रवासासाठी खुला होईल असं सांगितलं होतं, मात्र आता नितीन गडकरी यांनी ट्विटरवर माहिती देताना सांगितलं की हा पहिला टप्पा 12 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदीजी यांच्या करकमलाद्वारे सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. सोहना ते दौसा हा दिल्ली मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा असून यामुळे पिंक सिटी जयपूर ते राजधानी दिल्ली मात्र दोन तासात पार करता येणे शक्य होणार आहे.
किती आणि कसा आकारला जाणार टोल
या महामार्गावर प्रवाशी जेवढा प्रवास करेल तेवढाचं टोल भरावा लागणार आहे. मात्र किती टोल आकारला जाईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु इतर महामार्गाप्रमाणे प्रवासी वाहनांसाठी दोन रुपये प्रति किलो मीटर आणि व्यावसायिक वाहनांसाठी सात रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे टोल आकारला जाऊ शकतो. अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गावर प्रवेश करताना टोल आकारला जाणार नाही तर एक्झिट करताना टोल आकारला जाणार आहे. एवढेच नाही तर या महामार्गावर हेलिपॅड देखील उभारला जाणार आहे. या हेलिपॅडचा उपयोग अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्यासाठी होणार आहे. एवढेच नाही तर महामार्गावर पाचशे मीटर अंतरावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला 40 लाख झाड लावली जाणार आहेत.
महामार्गावर असणार या सुविधा
दरम्यान एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्गावर एकूण 93 ठिकाणी रेस्ट एरिया म्हणजेच विश्रांती घेण्यासाठी जागा तयार केली जाणार आहे. म्हणजेच 50 किलोमीटर अंतरावर एक रेस्ट एरिया प्रवाशांना लागणार आहे. या रेस्ट एरियामध्ये पेट्रोल पंप, मोटेल, विश्रांती गृह, रेस्टॉरंट आणि दुकाने राहणार आहेत. एवढेच नाही तर या विश्रांतीच्या ठिकाणी लहान मुलांना, वृद्धांना मोकळे बसण्यासाठी, लहानग्यांना खेळण्यासाठी गार्डन देखील तयार केला जाणार आहे. यामुळे दोन राजधानीमधला प्रवास हा अतिशय गमतीशीर राहणार आहे. मात्र या एक्सप्रेस वे वर वाहनात बिघाड झाल्याशिवाय थांबता येणार नाही. असे केल्यास चलन कापले जाणार आहे. वाहने रेस्ट एरियामध्ये थांबवता येणार आहेत. ओव्हरस्पीड वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी स्पीड गण राहणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास चलन देखील ऑनलाईन पद्धतीने कापले जाणार आहे. एवढेच नाही तर या महामार्गात वन्यजीवांसाठी ग्रीन ओव्हरपास देखील बनवले जात आहेत. याच्या अंतर्गत दोन 8 लेनचे बोगदे राहणार आहेत. राजस्थान मधील मुकुंदरा अभयारण्यत एक बोगदा राहणार आहे. तर दुसरा बोगदा चार किलोमीटर लांबीचा माथेरान अभयारण्यत राहणार आहे. निश्चितच हा महामार्ग अत्याधुनिक आणि हायटेक असा राहणार असून या महामार्गामुळे महाराष्ट्रासाठी राजधानी दिल्लीच अंतर जवळ होणार आहे. निश्चितच आता खऱ्या अर्थाने दिल्ली दूर नही जनाबं अशी म्हणण्याची वेळ येणार आहे. दरम्यान या महामार्गाचा पहिला टप्पा सोहना ते दौसा सर्वसामान्यांसाठी 12 फेब्रुवारीला खुला होणार असल्याने लवकरच हा संपूर्ण महामार्ग बांधून तयार होईल आणि यामुळे आर्थिक राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्ली या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभता होईल यात तीळमात्र देखील शंका नाही.