Delhi Mumbai Expressway Latest News : भारतात सध्या भारतमाला परियोजने अंतर्गत वेगवेगळ्या मोठं-मोठ्या महामार्गांचे कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. यामध्ये राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या दोन कॅपिटल सिटीला जोडणारा दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचा देखील समावेश आहे. हा भारतातील एक बहुचर्चित असा महामार्ग असून जगातील सर्वात लांब महामार्गाचा तमगा याला मिळणार आहे. जगातील सर्वात लांब अशा या महामार्गाबाबत आता एक मोठं अपडेट हाती आल आहे.
दरम्यान आणि आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग 1380 किलोमीटर लांब असून आख्ख्या जगात हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. हा प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. हा मार्ग एकूण 8 लेनचा राहणार आहे. मात्र याची एक मोठी विशेषता म्हणजे यां मार्गाला 12 लेनपर्यंत विस्तारित करता येणार आहे. म्हणजे बारा पदरी बनवण्यासाठी आवश्यक जागा ऑलरेडी या महामार्गसाठी संपादित करून ठेवण्यात आली आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी 98,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. सद्यस्थितीला महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली या दोन कॅपिटल सिटी दरम्यान प्रवास करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. पण हा एक्सप्रेस वे बांधून तयार झाल्यानंतर या दोन कॅपिटल शहरा दरम्यानचा प्रवास बारा तासांवर येणार आहे.
त्यामुळे निश्चितच अब दिल्ली दूर नही जनाब असं काहीस चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीने तयार होणार आहे. हा एक्सप्रेसवे कॉरिडॉरच्या दिल्ली-फरीदाबाद-सोहना विभागाद्वारे दिल्लीतील शहरी केंद्रांना जोडणार आहे. तसेच जेवार विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांना मुंबईशी जोडणार आहे. सध्या यां द्रुतगती महामार्गाचे बांधकाम जोरात सुरू आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच सर्वात मोठ वैशिष्ट्य
याशिवाय रस्ते वाहतूक मंत्रालय दिल्ली-मुंबई दरम्यान 2.5 लाख कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक हायवे बनवण्याची योजना आखली जात आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या महामार्गांवर ट्रॉलीबस आणि ट्रॉली ट्रक धावू शकतील. ट्रॉली बस या इलेक्ट्रिक बसेस आहेत ज्या ओव्हरहेड वायरने चालवल्या जातात. तर, इलेक्ट्रिक हायवे हा एक रस्ता आहे जो त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना वीज पुरवेल, ज्यामध्ये ओव्हरहेड पॉवर लाईन्सचाही समावेश आहे.
नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई महामार्गाबाबत शेअर केली ही अपडेट
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रस्त्याच्या बांधकामाबाबत वेळोवेळी अपडेट्स देखील शेअर करत असतात. दरम्यान आता गडकरींनी या जगातील सर्वात लांब महामार्गाच्या वडोदरा-विरार विभागातून जाणार्या महामार्गाच्या काही भागाची फोटो शेअर केली आहेत. ज्यामुळे महामार्गाची झलक आणि महामार्गाच्या कामाची माहिती समजण्यास मदत होत आहे.
हे फोटो या जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वेच्या गुणवत्तेचे उत्तम वर्णन करत असून या मनमोहक दृश्यामुळे भारताच्या विकासाचा मार्ग तयार होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. या चित्रांमध्ये डिझाइन आणि बांधकामाचा दर्जा स्पष्टपणे दिसून येतो. यापूर्वी देखील, गडकरींनी खानपूर खोरे आणि हरियाणा/राजस्थान सीमेला जोडणाऱ्या महामार्गाच्या भागाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
हा महामार्ग देशातील दोन सर्वात मोठ्या मेट्रो शहरांमधील हाय-स्पीड रोड कनेक्टिव्हिटी विकसित करणार आहे. शिवाय, नितीन गडकरींचा दावा आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय नागरिकांना जागतिक दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देणार आहे. त्यांनी ट्विट केले, PM श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय नागरिकांसाठी जागतिक दर्जाचे रस्ते सुनिश्चित करत आहोत.